आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सोहम’च्या अतिक्रमणाला महापालिकेचेच संरक्षण!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गजानन महाराज मंदिर रोडवर गारखेडा चौकातील दिशा संकुल फ्लॅट ओनर्स सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या व्यापारी संकुलात बिल्डर देवानंद कोटगिरे यांनी हॉटेल व्यावसायिकाला जागा दिली. त्यांनी सोहम चौपाटी नावाने हॉटेल थाटले. पाìकगच्या जागेचा बेकायदेशीर वापर सुरू केला. त्यामुळे वाहने रस्त्यावर लागतात. मुळात ही जागा व्यापारी संकुलात येणार्‍या सर्व ग्राहकांच्या वाहनांच्या सुविधेसाठी वाहन तळ म्हणून आरक्षित असताना सोहम चौपाटीचा चालक 10 वर्षांपासून स्वत:साठी वापर करत आहे. दिशा संकुल फ्लॅट ओनर्स सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या व्यापारी संकुलातील काही व्यापार्‍यांनी वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने अखेर त्यांनी डीबी स्टारकडे धाव घेतली. चमूने या प्रकरणी महिनाभर तपास करून 26 नोव्हेंबर रोजी गारखेडा चौकात ‘सोहम’ची पार्किंगच्या जागेवर ‘चौपाटी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. राजकीय पाठिंब्याआड नोटिसांचा सोपस्कार करून पालिका अधिकार्‍यांनी देखाव्याची म्हणजे थातूरमातूर कारवाई केली.

अशी झाली अर्धवट कारवाई
चमूने या प्रकरणी पाठपुरावा कायम ठेवला. 14 फेब्रुवारीला मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, महापौर कला ओझा यांनी सोहमचे अतिक्रमण काढण्याचे आदेश उपायुक्त किशोर बोराडे यांना दिले. पथक रवाना झाले, मात्र अर्धवट कारवाई करत हे पथक माघारी फिरले. यामुळे अतिक्रमण करणार्‍याला व्यवस्थेचे पक्के संरक्षण असल्याचे स्पष्ट होते.

आयुक्तांनाच आव्हान
‘सोहम’ हे अतिक्रमणाचे उदाहरण आहे. सुखना असो वा इतर व्यापारी संकुल. पार्किंगच्या जागांना इमारत निरीक्षक आणि वरिष्ठ असेच संरक्षण देतात. सोहमने वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अर्धे पत्रे काढले. त्यानंतर अतिक्रमण हटाव पथकाने भिंतीच्या चार विटा पाडून कारवाई केल्याचा देखावा केला. त्यामुळे अतिक्रमणासह त्याला संरक्षण देणार्‍या अधिकार्‍यांवरही कारवाईची मागणी होत आहे.

गारखेडा चौकातील पार्किंगच्या जागेवरचा कब्जा म्हणजे अतिक्रमण हटाव पथकाच्या भ्रष्ट कारभाराचा आणखी एक नमुना आहे. बड्या बिल्डरचे कारनामे संपवण्यासाठी ही यंत्रणा आयुक्तांनाच आव्हान देत आहे. वारंवार नोटिसा बजावल्यानंतर आणि अतिक्रमण काढण्याचे आदेश दिल्यानंतर आता इमारत निरीक्षकांना बिल्डरची बाजू योग्य वाटत आहे. त्यामुळे फक्त थोडीफार पाडापाडी करून पथक परतले. त्यामुळे या अतिक्रमणाच्या माध्यमातून डीबी स्टार संबंधिताचा पर्दाफाश करत आहे.

ताळमेळ नसल्याचे हे घ्या पुरावे
कसून चौकशी करणार
हे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकाची कसून चौकशी करणार. ही संचिका तपासून पाहणार. यात कुणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करणार.- डॉ. हर्षदीप कांबळे, आयुक्त, मनपा

कागदपत्रे तपासतो
मला याबाबत काहीच माहिती नाही. इमारत निरीक्षकांच्या सांगण्यावरून हे अतिक्रमण काढणे थांबवले. बांधकामाची परवानगी नसेल तर आम्ही कारवाई करणारच. त्यामुळे आधी कागदपत्रे तपासतो व मग निर्णय घेतो.-किशोर बोराडे, उपायुक्त

पार्किंगची जागा मोकळी करणार
मिटमिटा येथे मोठय़ा प्रमाणात कारवाई चालू असल्याने तत्काळ या पथकाला तिकडे रवाना करावे लागले. म्हणूनच सोहमवर अर्धवट कारवाई करण्यात आली. येथे कुठलीही बांधकाम परवानगी दिलेली नसल्याचे आमच्याकडे पुरावे आहेत. त्यामुळे ती पाìकगची जागा मोकळी करणारच.- बी. के. गायकवाड, प्रशासकीय अधिकारी

मालकीचे पुरावे आहेत
हे अतिक्रमण काढताना आम्ही कागदपत्रे तपासली असता त्यांनी मालकीहक्काचे पुरावे सादर केले. त्यामुळे ही भिंत दोन फूट काढली आहे. - टी. जी. गवळी, इमारत निरीक्षक