आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Aurangabad Jalgaon Railway Surevey Not Done

सोलापूर-औरंगाबाद-जळगाव रेल्वेमार्गाचे सर्वेक्षणच नाही, माहिती अधिकारातून उघड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्रस्तावित सोलापूर-जळगाव रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण औरंगाबादमार्गे झालेच नाही. माहितीच्या अधिकारात हे स्पष्ट झाले. यामुळे सर्वेक्षण झाल्याचा मध्य रेल्वेचा दावा फोल ठरला आहे.सर्वेक्षणासाठी 2007-2008 मध्ये रेल्वे अर्थसंकल्पात 67 लाख रुपयांची तरतूद होती. मात्र हा निधी कुठे गेला, हा प्रश्न आता पउला आहे.
या सर्वेक्षणाचा श्रीगणेशा मराठवाडा रेल्वे विकास समितीच्या वतीने पैठण येथील संत एकनाथ मंदिरापासून करण्यात आला होता. निधी मिळावा यासाठी खासदार चंद्रकांत खैरे, ओमप्रकाश वर्मा, सुधाकर चव्हाण, तारा लड्डा, कल्याण बरकसे, सुधाकर डोईफोडे यांनी मध्य रेल्वेला निवेदने दिली होती. तेव्हा सर्वेक्षण प्रगतिपथावर असल्याचे सांगण्यात आले; परंतु समितीचे ओमप्रकाश वर्मा यांनी माहिती अधिकारात पत्र पाठवून कामासंबंधीचा तपशील विचारला तेव्हा अशा कुठल्याच मार्गाचे सर्वेक्षण केले नसल्याचे स्पष्ट केले.
हा प्रस्तावित मार्ग गेवराईपासून शहागड- अंबड- जालना- भोकरदन-सिल्लोड मार्गे जळगाव असा वळवण्यात आल्याचा आरोप होत होता. मध्य रेल्वेनेच माहिती दिल्याने एकप्रकारे यावर शिक्कामोर्तब झाले.
देवस्थान जोडण्यासाठी...
पर्यटन व देवस्थानांना जोडण्यासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी 2007-2008 रेल्वे अर्थसंकल्पात सोलापूर-जळगाव मार्गासाठी 67 लाख रुपयांची तरतूद केली होती. हा मार्ग सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद- बीड- गेवराई- पैठण-औरंगाबाद- वेरूळ- अजिंठा व जळगाव असा होता.