आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Dhule Highway Issue Latest News In Marathi

सोलापूर-धुळे मार्गासाठी 3 हजार कोटींचा प्रस्ताव, औरंगाबाद जिल्ह्यात भूसंपादन प्रक्रिया रखडली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्रस्तावित सोलापूर-औरंगाबाद-धुळे महामार्गासाठी सर्व संबंधित जिल्ह्यांतील भूसंपादन पूर्ण झालेले असले तरी औरंगाबाद जिल्ह्यातील भूसंपादन रखडल्यामुळे त्याचे काम अद्याप सुरू होऊ शकलेले नाही. दरम्यान, हा महामार्ग आणि त्यावरील कन्नड घाटातील बोगदा तयार करण्यासाठी तीन हजार कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने तयार केला असून शुक्रवारी (21 फेब्रुवारी) त्याला दिल्लीत मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
या महामार्गासाठी सोलापूर, उस्मानाबाद, बीड, जालना, जळगाव, धुळे जिल्ह्यातील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, तेथील कामाला सुरुवातही झाली आहे. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद ते कन्नड या 80 किमी रस्त्यासाठी भूसंपादन अद्यापही झालेले नाही. गेल्या 13 फेब्रुवारी रोजी महामार्ग प्राधिकरणाचे संचालक जे. यू. चामरगोरे यांनी भूसंपादनासाठी संबंधित विभागांची बैठक घेतली. या विभागांनी ना-हरकत देण्याची तयारी दर्शविल्याने भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे. औरंगाबाद शहरातून जाणारा रस्ता बाहेरून घ्यावा, असा आग्रह विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांनी धरला होता, पण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तयार केलेल्या प्रस्तावात बदल करणे शक्य नसल्याने तो मूळ आराखड्याप्रमाणेच केला जाणार आहे.
दिल्लीत पंतप्रधानांच्या उपस्थितीत आज बैठक
राष्ट्रीय महामार्गांचे जाळे वाढवण्यासाठी महाराष्ट्र, खान्देश, उत्तर महाराष्ट्रातील रस्ते दक्षिण व उत्तर भारतातील रस्त्यांना जोडण्याचा कार्यक्रम केंद्र सरकारने हाती घेतला आहे. त्यानुसार हा महामार्ग तयार केला जात असून, औरंगाबाद ते कन्नड या कामासाठी लागणार्‍या तीन हजार कोटी रुपयांच्या मंजुरीचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात आल्याचे महामार्ग प्राधिकरणाच्या सूत्रांनी सांगितले. शुक्रवारी, 21 फेब्रुवारीला पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार्‍या ‘इंटर मिनिस्ट्रियल ग्रुप’च्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
राज्यमार्ग होणार राष्ट्रीय
दरम्यान, 7,200 किमी लांबीच्या राज्य महामार्गांना राष्ट्रीय महामार्गांत रुपांतरित करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिली. देशात आजघडीस 80 हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. या निधीतून त्यांचा विकास केला जाईल.
465 किमी सोलापूर-धुळे रस्त्याची एकूण लांबी