आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Dhule National Highway , Latests News, Divya Marathi

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गासाठी ‘वाल्मी’ संस्थेचा कांगावा अनाठायी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-सोलापूर-धुळे महामार्गात वाल्मीचा केवळ पाच टक्के हिस्सा बाधित होत असताना संस्थेने अनाठाई कांगावा सुरू केला आहे. वाल्मी शासनाची संस्था असून यासंबंधी शासन उचित निर्णय घेईल. महामार्गामुळे बाधित होणारे पाच टक्के क्षेत्र यापूर्वी दोन वेळा लीजवर देण्यासाठी जाहीर प्रगटन दिले होते. त्यामुळे आज कुठल्या अधिकारात वाल्मी व्यवस्थापनातर्फे महामार्गास विरोध केला जात आहे, असा प्रश्न परिसरातील मालमत्ताधारकांनी उपस्थित केला आहे.
शहरातून जाणारी वाहतूक बाहेरील बाजूने वळवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गांधेली, बाळापूर, देवळाई, सातारा, कांचनवाडी परिसरातून बायपास प्रस्तावित केला आहे. शक्य तितक्या नागरी वसाहती वगळून बायपास नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वीचा महामार्गाचा बायपास रद्द करून नवीन बायपास मार्ग प्रस्तावित केला आहे. बायपासमध्ये कांचनवाडी परिसरातील वाल्मी या शासकीय संस्थेच्या एकूण 179 हेक्टरपैकी (442 एकर) केवळ साडेनऊ हेक्टर क्षेत्र महामार्गात जात आहे. उपरोक्त क्षेत्र वाल्मीच्या एकूण क्षेत्रापैकी केवळ पाच टक्के इतके आहे. महामार्गाच्या एका बाजूला नव्वद, तर दुसर्‍या बाजूला दहा टक्के जागा आहे. वाल्मी व्यवस्थापनाकडे उपलब्ध असलेली जागा मागील चाळीस वर्षांत कधीच वापरली गेली नाही.
झारीतल्या शुक्राचार्यांना रोखा
वाल्मीची स्थापना जायकवाडी धरणासाठी कर्ज देताना घातलेल्या अटींमुळे अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात आली होती. धरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे वाल्मीचे काम नाममात्र राहिले आहे. वाल्मीच्या अधिकार्‍यांना सकारात्मक भूमिका घेण्याचे धाडस होत नाही. ज्या राष्ट्रवादीकडे पाटबंधारे खाते आहे त्यांच्या स्थानिक प्रतिनिधींनी शहराच्या विकासासाठी पुढे येऊन झारीतील शुक्राचार्यांना रोखण्याची गरज असल्याचे जे. यू. मिटकर, अँड. लता बढे, निखिल मिटकर, सुहास वैद्य, रामकृष्ण जोशी, व्ही. डी. चौधरी, भालचंद्र अत्रे, जगन्नाथ हिंगणे, महेश राठी, पी. टी. शिंदे, विजय निरखी, नीळकंठ कोठेकर, बापूराव वाळके यांनी निवेदनात म्हटले आहे.