आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solar Agricultural Pump Stitch Cross Border Farmers Drought

सौर कृषिपंपाच्या साथीने शेतकरी ओलांडणार दुष्काळाची सीमा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पाण्याअभावी करपणारी पिके पाहून हताश होणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी राज्यात १० हजार सौर कृषिपंप बसवण्याचा पथदर्शी प्रकल्प राबवण्याचे नियोजन राज्य शासनाने केले आहे. मूळ दराच्या अवघी पाच टक्के रक्कम देऊन ते ७.५ अश्वशक्तीचे संच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सौर कृषिपंपांमुळे शेतकरी वीजजोडणी मिळवण्याची चिंता, भारनियमनाचे भय आणि पिके हातातून जाण्याच्या संकटातून मुक्त होणार असून भयावह दुष्काळाची सीमा ओलांडणेही शक्य होणार आहे.
राज्यातील हजारो शेतकरी वीजजोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच वीजजोडणी असूनही भारनियमनामुळे पिके काेमेजण्याचे प्रकारही घडत आहेत. विजेच्या त्रांगड्यामुळेच विहिरीत पीक जगवण्यापुरता जलसाठा असूनही उत्पादनात घटही येते. या कारणांमुळे प्रचंड नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्यांपुढे भयाण दुष्काळाचेही संकट आहेच. अशा अनंत अडचणींमुळे अनेक शेतकरी आत्महत्येचा मार्गही स्वीकारत आहेत. ही स्थिती बदलण्यासाठी शासनाने सौरऊर्जेच्या वापरावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी धोरणही निश्चित करण्यात आले असून शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात १० हजार सौर कृषिपंप देण्याचे नियोजन केले आहे.

पाचवर्षे मोफत देखभाल
शेतकऱ्यांनाकेवळ पाच टक्के रक्कम भरायची असून प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. एजन्सीमार्फत सौर कृषिपंप शेतात बसवण्यात येणार असून पाच वर्षे देखभाल दुरुस्तीचे काम एजन्सी विनामूल्य करेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

सर्वांना समान न्याय द्या
शासनाच्याया निर्णयामुळे राष्ट्रीय उत्पन्नातही वाढ होईल. मात्र, शासनाने भेदभाव करता सर्वांना समान न्याय द्यावा, मागेल त्याला सौर कृषिपंप देण्याचे नियाेजन करावे. त्र्यंबकपाथ्रीकर, उद्यान पंडित पुरस्कारप्राप्त शेतकरी

पिकांची चिंता मिटणार
सौरकृषिपंपांची किंमत खूप जास्त असते. मात्र, नव्या धोरणानुसार शासनाकडून सवलतीच्या दरात हे पंप मिळणार असल्याने पिकांना पाणी देण्याची चिंताही मिटणार आहे. पंडितलोणारे, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी

या शेतकऱ्यांना घेता येईल लाभ
- अतिदुर्गम,विद्युतीकरण झालेला भाग, वन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र मिळालेले शेतकरी
- वीज जोडणीसाठी पैसे भरूनही जोडणी मिळालेले
- अकोला, अमरावती, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ आणि वर्धा या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी

क्षमतेनुसार भरावयाची रक्कम
-३अश्वशक्ती (एसी) १६२००
-३ अश्वशक्ती (डीसी) २००००
-५ अश्वशक्ती (एसी) २७०००
-५ अश्वशक्ती (डीसी) ३३७५०
-७.५ अश्वशक्ती (एसी) ३६०००