आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्ह्यातील दुर्गम वस्त्या, गावांसाठी सौरऊर्जा ठरतेय वरदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ४८ दुर्गम वाड्या-वस्त्यांना अखंडित पाणी मिळावे, यासाठी सौरऊर्जा पंप बसवण्यात आले आहेत. यामुळे पारंपरिक वीज, श्रमाशिवाय ग्रामस्थांना चोवीस तास पिण्याचे पाणी मिळण्याची सोय उपलब्ध झाली आहे. सौरऊर्जेचा प्रयोग यशस्वी ठरल्याने यंदा आणखी नऊ दुर्गम गावांत सौरपंप बसवण्यात येणार आहेत. ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी सौरऊर्जेचा वापर करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.
ग्रामीण भागात १४ तासांपर्यंत भारनियमन केले जात आहे. वाड्या, तांडे, दुर्गम गावात वीज नसते. येथील ग्रामस्थांना, विशेषत: महिला मुला-मुलींना बोअरवेलचे, विहिरीतून शेंदून पाण्याचा उपसा केल्याशिवाय पर्याय नाही. जेथे विजेची व्यवस्था आहे तेथे वीज वित्तहानी मोठ्या प्रमाणावर आहे. परिणामी पाणीपुरवठा योजना बंद पडल्या असून काही मोडकळीस आल्या आहेत.

या सर्व ठिकाणच्या नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाने उच्च क्षमतेच्या विंधन विहिरींवर दुहेरी पंप व्यवस्थेवर आधारित लघु नळ पाणीपुरवठा योजना विकसित केली. त्यासाठी सौरऊर्जा पंप बसवून या योजनेची ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.

यंदा नऊचे उद्दिष्ट : जिल्ह्यातगत पाच वर्षांत ४८ दुर्गम गावांत बोअरवेलवर सौरपंप कार्यान्वित केले आहेत. यामुळे २४ तास पाण्याची सोय झाली. यंदा नऊ गावांत सौरऊर्जा पॅनल बसवण्यात येतील. त्यापैकी वांगी, कन्नड तालुक्यातील लोहगाव, फुलंब्रीतील कविटखेडा, वैजापुरातील धोंदलगाव आणि खुलताबादेतील चिंचोली गावातील काम प्रगतिपथावर आहे. एका पॅनलसाठी सरासरी पाच लाख रुपये खर्च येणार आहे. एक एचपीच्या सौर पॅनलपासून एका तासात १८०० ते हजार लिटर पाणी उपसा करता येतो, अशी माहिती जि. प. पाणीपुरवठा यांत्रिकी विभागाचे उपअभियंता बाळासाहेब पाटील यांनी दिली.

पाणी पुरवठ्यासाठी सौरऊर्जेचा विचार
विजेच्या खर्चात बचत व्हावी, ग्रामस्थांना चोवीस तास पाणी मिळावे यासाठी सौरऊर्जा पंप बसवण्यात येत आहेत. चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगात यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार ते एचपीचे सोलारपंप बसवण्यात येतील. त्यासाठी जि. प. पाणीपुरवठा विभागाकडून ग्रामपंचायतींना तांत्रिक मार्गदर्शन केले जाईल, असे पाटील यांनी सांगितले.

शेतीसाठी सौरपंपाचा नाममात्र वापर
पीकऐन बहरात असताना वीज गुल होते. वेळेवर पाणी देता येत नाही. सौरपंपाचा वापर कमी प्रमाणात होत असल्याने विजेअभावी उत्पादनात मोठी घट होते. तसेच दुष्काळात जिल्ह्यातील ६३३ गावे, ३६ वाड्या-वस्त्यांवर ९४९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. त्यासाठी ७० कोटी २२ लाख रुपये खर्च आला. यासाठी सौरपंपाचा वापर केल्यास या खर्चात मोठी बचत होईल, असे तज्ज्ञांनी सांगितले.

{यंदा आणखी दुर्गम गावांत सौरऊर्जा पंप कार्यान्वित होणार
{सौरपंप बसवल्याने ४८ वाड्या-वस्त्यांना २४ तास पाणी
बातम्या आणखी आहेत...