आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonia Gandhi Hands Over Key To Nehru Papers, Access Now Controlled Only By PMO

हैदराबाद लढ्यातील नेहरूनीती उघड होणार, गांधी कुटुंबाचा हक्क आता संपुष्टात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेली पत्रे आता गांधी कुटुंबाच्या परवानगीविना उपलब्ध होऊ शकतील. नेहरूंची १९४६ नंतरची पत्रे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी खुली केली आहेत. यामुळे सप्टेंबर १९४८ च्या हैदराबाद संस्थानातील लष्करी कारवाईमागील नेहरूंची नेमकी भूमिका स्पष्ट होणार आहे.

स्वातंत्र्यानंतर फाळणीसोबतच काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद संस्थानांच्या विलीनीकरणाचा मुद्दाही गाजला होता. काश्मिरात राजा हरिसिंह, तर हैदराबाद संस्थानात निझाम मीर उस्मान अलीच्या भूमिकांमुळे वाद निर्माण झाला होता. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे अभ्यासक प्रा. दिनकर बोरीकर यासंदर्भात म्हणाले की, नेहरूंची निझामाला सहानुभूती होतीच. अर्थात त्यामागे अल्पसंख्याकांविषयी त्यांचे असलेले धोरण होते. परंतु कारवाईचा बडगा उगारला गेल्यास निझाम पाकिस्तानचा हत्यार म्हणून वापर करील, अशी भीतीही नेहरूंना वाटत होती.
हैदराबादेत लष्कर पाठवावे किंवा नाही यावरच आधी मतभेद होते. परंतु हिंदूंचे सामूहिक शिरकाण करण्याची धमकी निझामाचा सल्लागार कासीम रझवीने दिल्यानंतर कारवाई करण्याचे ठरले. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक चांगला तोडगा सुचवला होता. लष्करच पाठवा, परंतु पोलिस अॅक्शनचे नाव द्या. म्हणजे हा अंतर्गत प्रश्न असल्याचे दिसेल, असे आंबेडकरांनी सुचवल्याचे बोरीकर यांनी सांगितले.
वास्तविक १२ सप्टेंबर रोजी लष्कर घुसवण्यात येणार होते. परंतु बॅ. महंमद अली जीना यांचा मृत्यू झाल्याने १३ सप्टेंबर रोजी कारवाई झाली. तीन दिवसांत म्हणजे १७ सप्टेंबर रोजी निझाम शरण आला होता.
आता पीएमओचीच परवानगी
नेहरूंचीपत्रे दोन भागांत आहेत. एक १९४६ पूर्वीचा आणि दुसरा भाग १९४६ नंतरचा आहे. ४६ पूर्वीची पत्रे आधीच खुली झालेली आहेत. नंतरच्या पत्रांसाठी गांधी कुटुंबीय पंतप्रधान कार्यालयाची परवानगी घ्यावी लागायची. पण आता पीएमओचीच लागेल. नेहरू म्युझियम ग्रंथालयात ही पत्रे आहेत.
> फाळणीच्या वेळच्या दंगली, गांधीजींचा नौखालीतील काळ.
> देशातील अस्थिर स्थिती, लाॅर्ड माउंटबॅटनच्या हाती पुन्हा सूत्रे.
> काश्मीरसह जुनागड, हैदराबाद संस्थानांच्या विलीनीकरणामागील नेहरू सरदार पटेलांची भूमिका.
> मराठी भाषिक संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमागील नेहरूंचे मत काय, मोरारजींशी पत्रव्यहार होता काय?
> चीनने १९६२ मध्ये भारतावर केलेल्या आक्रमणाच्या वेळी नेहरूंना नेमके काय वाटत होते.