आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत सोनोग्राफी सेंटर्सचा बेमुदत बंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबद - सध्या गाजत असलेल्या गर्भनिदान आणि स्त्री भ्रूणहत्येविरूध्द प्रशासनाकडून होत असलेली कारवाई अन्यायकारक आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबादेतील सोनोग्राफी सेंटर्सनी बेमुदत बंदचे हत्यार उपसले आहे. बंद दरम्यान गंभीर असलेल्या रूग्णांचीच तपासणी करणार असल्याचेही संघटनेतर्फे जाहीर करण्यात आले आहे . कागदपत्रांच्या त्रुटींमुळे रूग्णालय सील करणे हे अन्याय करण्यासारखे असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
गर्भनिदान करणार्‍या आणि कागदपत्रांची त्रुटी असणार्‍या डॉक्टरांना एकच शिक्षा अमान्य असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर गर्भपात आणि सोनोग्राफी सेंटर्सनी कोणकोणत्या प्रकारची कागदपत्र बाळगावी याची यादी जिल्हा समिती आणि राज्य समितीने द्यावी, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. मागण्यांची पूर्तता जोपर्यंत केली जाणार नाही तोपर्यंत संघटना आपल्या भूमिकेवर ठाम राहणार असल्याचेही संघटनेतर्फे सांगण्यात आले.