आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जड वाहनांना शहरबंदी, मात्र बोर्डच नाही!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहानूरमियाँ दर्गा परिसरात शहरात प्रवेश केलेल्या ट्रकचालकाची झाडाझडती घेताना पोलिस कर्मचारी. - Divya Marathi
शहानूरमियाँ दर्गा परिसरात शहरात प्रवेश केलेल्या ट्रकचालकाची झाडाझडती घेताना पोलिस कर्मचारी.
औरंगाबाद- पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरात जड वाहनांना बंदी घातल्यामुळे वाहतूक रखडणे, अपघातासारख्या घटनांना आळा बसला आहे. शहरात येणाऱ्या जड वाहनांना दंडही केला जात आहे. मात्र, शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गांवर जड वाहनांना प्रवेशबंदी असल्याचे बोर्डच लावले नसल्याने वाहनचालकांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.
शहरालगतच्या बीड बायपास, जळगाव रोड, नाशिक रोड, नगर रोड, जालना रोड येथून जड वाहने शहरात प्रवेश करतात. या प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती केल्यामुळे अशी वाहने शहरात क्वचितच येतात. जड वाहनांमुळे शहर परिसरात अनेक मोठे अपघात झाले आहेत. नगर नाक्याजवळ कंटेनरने दुचाकीला ठोकरल्याने ७० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. यामुळे ही मोहीम आणखी तीव्रतेने सुरू करण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

लाखोंचादंड वसूल
शहरातचुकून एखाद्या जड वाहनाने प्रवेश केलाच तर सर्वप्रथम "नो एंट्री'साठी १०० रुपये दंड आकारला जातो. काही चालकमंडळींनी टोल स्वरूपात हा दंड भरण्याचा फंडा अवलंबला होता. यामुळे पोलिसांकडूनही नो एंट्रीव्यतिरिक्त १८४ (धोकादायकरीत्या वाहन चालवणे), १३२ (पोलिसांनी हात दाखवल्यानंतरही वाहन थांबवले नाही) तसेच गाडीची कागदपत्रे तपासून दंडाची रक्कम वाढवण्यात येते. १२ मेपासून शहरात २४ तास जड वाहनबंदीचा निर्णय पोलिस आयुक्तांनी घेतला. तेव्हापासून आजवर सुमारे चार लाखांच्या आसपास दंड जमा झाला आहे.

जडवाहने नजरचुकीने शहरात
बंदीअसतानाही काही जड वाहने शहरात येतात. ही मंडळी आमची नजर चुकवून शहरात दाखल होतात, पण शहरातून बाहेर पडताना आम्ही त्यांना दंड करतोच, असे सूत्रांनी स्पष्ट केले असले तरी वाहनचालक आ‌ेळख किंवा पैसे देऊन शहरात प्रवेश करीत असावेत, या शंकेला वाव आहे.
सिग्नलची मागणी
शहरातयेणाऱ्या प्रत्येक चौकात २४ तास पोलिस तैनात करण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी नेहमीच वाहतूक रखडत असल्याने महापालिका प्रशासनाने सिग्नल बसवण्याची मागणी वाहतूक पोलिसांनी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने देवळाई चौक, शहानूरमियाँ दर्गा चौक आणि गोदावरी ढाबा चौकात सिग्नलची आवश्यकता आहे.

‘नोएंट्री’चे बोर्डच नाहीत
पोलिसआयुक्तांच्या नियमानुसार कारवाईचे शहरातील सर्व वर्गांतून स्वागत होत आहे. ट्रकचालकही या नियमांचे स्वागत करत आहेत. मात्र शहरात येताना कुठेही ‘नो एंट्री’ चा बोर्ड दिसला नसल्याने आम्ही शहरात प्रवेश करतो. ‘नो एंट्री’ चे बोर्ड सते तर आमचा दंड वाचला असता अशी प्रतिक्रिया एका ट्रकचालकाने दिली

आम्ही दंड आकारतो
आम्हीजड वाहनांना नो एंट्रीचा दंड लावून त्याच मार्गाने परत पाठवतो. काही शंका आली किंवा वाहन थांबवताच पुढे नेले तर पुढच्या चौकात अथवा पाठलाग करून ते थांबवले जाते. शिवाय गाडीची कागदपत्रे, लायसन्स तपासून दंड आकारतो. नो एंट्रीला १०० रुपये दंड आहे. तसेच वेगवेगळ्या कलमांनुसार दंडाची रक्कम वाढत जाते. हेमंतकदम, पोलिसनिरीक्षक, वाहतूक विभाग