आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोयगावच्या शाळेत पोषण आहार शिजवणाऱ्या गटाचे काम बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोयगाव- येथील जिल्हा परिषद प्रशालेत शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या बहिणाबाई महिला बचत गटास कोणतीही पूर्वसूचना न देताच आहार शिजवण्यास मनाई करत मुख्याध्यापकांनी काम बंद केले आहे. पोषण आहार शिजवण्यास मनाई करणाऱ्या त्या मुख्याध्यापकांची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गटाच्या अध्यक्षा कमलबाई मधुकर पगारे यांनी निवेदनद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
बहिणाबाई महिला बचत गटास १ जुलै २०१४ पासून शालेय पोषण आहार शिजवण्याचे काम देण्यात आले होते. मात्र, यादरम्यान शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक आनंद इंगळे हे या गटाच्या सदस्यांना नेहमी त्रास देतात. जुलै-ऑगस्टच्या धनादेशासाठी २० हजारांची मागणी केली. त्यांची मागणी पूर्ण न करू शकल्याने त्यांनी शालेय व्यवस्थापन समितीशी संगनमत करून आमच्यावर तांदूळ चोरीचे खोटे आरोप लावले आहेत. यात कोणतेही तथ्य आढळून न आल्याने त्यांनी पुन्हा त्रास देणे सुरू केले आहे. विशेषत मुख्याध्यापक स्वत: शालेय पोषण आहाराचे तांदूळ व तेल आदी साहित्य दुचाकीने घेऊन जातात.
बातम्या आणखी आहेत...