आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Spacial Police Inspector Journal Vishwas Nangare Patil Lecture On Competitive Exams In Aurangabad

स्वप्न + जिद्द + प्रयत्न = यश, विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे पाटील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- स्वप्नपाहा, जिद्द बाळगा आणि प्रामाणिक प्रयत्न करा, यश नक्की मिळेल, अशी यशाची त्रिसूत्री विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो युवकांना सांगितली. "दिव्य मराठी' आणि रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे आयोजित "कॉफी विथ ऑफिसर्स' उपक्रमाचे रविवारी सकाळी सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी नांगरे पाटील बोलत होते.

या वेळी नांदेडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील, हिंगोली जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विशाल राठोड, गटविकास अधिकारी डॉ. रामप्रसाद लाहोटी, औरंगाबाद ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार, रिलायबलचे संचालक धनंजय आकात आणि दिव्य मराठीचे स्टेट व्हर्टिकल हेड (एज्युकेशन) बाळासाहेब खवले यांची प्रमुख उपस्थिती होती.अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या शेकडो तरुण-तरुणींनी कार्यक्रमाला गर्दी केली.
ओळख मराठी अधिकाऱ्यांची
डॉ.विशाल राठोड
मूळगाव परळी. गावातील शाळेत शिक्षण. १२ वीत इंग्रजीमध्ये नापास, मात्र त्यानंतर जिद्दीने प्रयत्न करून वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर स्पर्धा परीक्षांची तयारी. सध्या हिंगोली जि. प. मध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक.

गणेश पाटील
मूळगाव जळगाव जिल्ह्यातील एरंडोल. व्यावसायिक अभ्यासक्रमात पदवी, त्यानंतर एमबीए केले. काही काळ खासगी नोकरी त्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी. सध्या नांदेड येथे राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक म्हणून नियुक्ती.

डॉ.रामप्रसाद लाहोटी
मूळगाव बीड जिल्ह्यातील. बीएएमएस करुन काही काळ वैद्यकीय क्षेत्रात काम. नंतर पोलिस पीएसआय एसटीआय परीक्षा पास. सध्या खुलताबाद येथे गटविकास अधिकारी म्हणून नेमणूक
सुनीललांजेवार
मूळगाव नाशिक. काही काळ खासगी नोकरी. त्यानंतर सेल्सटॅक्स इन्स्पेक्टर म्हणून नोकरी. त्यानंतर एपीएसी परीक्षा देऊन पोलिस खात्यात प्रवेश. सध्या ग्रामीणचे डीवायएसपी म्हणून नेमणूक.

"कॉफी विथ ऑफिसर्स' कार्यक्रमाला शहरातील श्रोत्यांसह शेजारील जिल्ह्यातील तरुणाईने मोठ्या संख्येने हजेरी लावली.

स्वत:तील क्षमता ओळखा
नांगरेपाटील म्हणाले, तरुणांमध्ये क्षमता आहे. मात्र ती त्यांनी ओळखून आत्मविश्वासाने प्रयत्न करावेत. सूत्रसंचालन प्रेषित रुद्रवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी रिलायबलचे सर्व शिक्षक आणि कर्मचारी, "दिव्य मराठी'चे सहायक व्यवस्थापक सत्यजित घुगे, राहुल देवके, निखिल डायलकर, शिवम पवार यांनी प्रयत्न केले.

...आणि भावड्या अधिकारी झाला
स्पर्धापरीक्षांच्या तयारीसाठी मी मुंबई गाठली. मला घरी सगळे भावड्या म्हणायचे. ख्यालीखुशाली विचारण्याकरिता वडील पोस्टकार्ड पाठवायचे. प्रत्येक पत्रात एक शेवटची ओळ असायची "भावड्या मी जिवंत असेपर्यंत तुला लाल दिव्याच्या गाडीत पाहायचे आहे.' वडिलांनी प्रत्येक पत्रात लिहिलेल्या याच ओळी मला त्या काळात प्रेरणादायी होत्या, असे नांगरे पाटील म्हणाले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी दहा सूत्रे...