आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special App For Aurangabad's Women Young Girls Security

औरंगाबादेतील महिला-तरुणींच्या सुरक्षेसाठी खास अॅप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - चार-पाच महिन्यांपासून औरंगाबादेत महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महिलांना मदत करणारे खास अँड्रॉइड अॅप तयार करण्यात आले असून त्यावर तातडीच्या मदतीसाठी पोलिसांचे क्रमांक तसेच स्वसंरक्षणाच्या टिप्स आणि महिलांविषयक कायद्यांची माहिती देण्यात आली आहे.
औरंगाबाद शहरात महिला विशेषत: महाविद्यालयीन तरुणींची छेडछाड करण्याचे प्रकार वाढत आहेत. याशिवाय काही महिन्यांत सुंदरवाडी तसेच गोलवाडीत बलात्काराच्या घटनाही घडल्या. मवाल्यांच्या त्रासाला कंटाळून एका महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्याही केली होती. या पार्श्वभूमीवर महिलांची सुरक्षितता हा चिंतेचा विषय बनला आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी यासंदर्भात दामिनी पथक पुन्हा अलर्ट करत महाविद्यालयांच्या परिसरात तसेच बाजारपेठांत गस्त वाढवण्यासारखेही उपाय केले आहेत. असे असले तरी महिलांना तरुणींना अशा प्रकारापासून सावध राहण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदतीची अथवा परिस्थितीला तोंड देण्याची वेळ आली तर काय करावे याविषयी पुरेशी सुविधा उपलब्ध नव्हती. आता एका अँड्रॉइड अॅपने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

असे पहिलेच अॅप
औरंगाबादेतीलसाॅफ्टवेअर व्यावसायिक रेणुकादास देशमुख यांनी 'महिषासुरमर्दिनी’ नावाचे एक अॅप तयार केले आहे. नुकतेच ते गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. आतापर्यंत महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील अनेक अॅप उपलब्ध असले, तरी औरंगाबादला केंद्रस्थानी ठेवून बनवण्यात आलेले हे पहिले अॅप आहे, असे देशमुख म्हणाले.

अॅपवर टिप्सचे व्हिडिओ
>या अॅपमध्ये औरंगाबाद पोलिसांनी तयार केलेल्या दामिनी पथकाचे फोन क्रमांक तसेच मुंबई दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकांचे क्रमांक आहेत. राष्ट्रीय पातळीवरील महिलांच्या हेल्पलाइनचे क्रमांकही येथे उपलब्ध आहेत.
>याशिवाय महिलांची सुरक्षितता त्यासंदर्भातील माहिती टिप्स येथे देण्यात आलेल्या आहेत.
>त्यात फेसबुकवरील निर्भया पेजची लिंक, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, त्याचा तपशील, हुंडा प्रतिबंधक कायदा त्याचा तपशील, तसेच स्वसरंक्षणासाठी काय करावे याच्या टिप्स त्यात आहेत.
>राज्य महिला आयोगाची माहिती त्यांचे संपर्क क्रमांक आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वसंरक्षणाच्या टिप्सचे खास व्हिडिओही येथे शेअर करण्यात आले आहेत.