आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाशिवरात्र विशेष - शिवपार्वतीचे लग्न रात्री बारा वाजता\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लग्नघटिका जवळ आली तशी दोन्ही बाजूंच्या वऱ्हाडींची लगबग सुरू झाली. वर महादेव व वधू पार्वती यांचा पुजारी मंडळीने शृंगार केला. गुरुजींनी माईक हातात घेऊन सर्वांना सावधान केले. ‘प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दयासागरा...’ या मंगलाष्टकाने विवाह सोहळा सुरू झाला. ‘तदेव लग्नं सुदिनं तदेव, ताराबलं चंद्रबलं तदेवं...’ ही मंगलाष्टकांची अंतिम कडवी होताच रात्री बाराच्या ठोक्याला सनई-चौघडा निनादू लागला. वधू-वरांच्या अंगावर अक्षता पडून टाळ्यांचा कडकडाट झाला.

हिंदू धर्मात भगवान शंकर आणि देवी पार्वतीची जोडी आदर्श मानली जाते. प्रत्येक मंदिरात शिव-पार्वती शेजारी शेजारी असतात; पण जुना भावसिंगपुरा येथील श्री सत्येश्वर शिवपार्वती मंदिरात शिव आणि पार्वती विरुद्ध दिशेला, वेगवेगळ्या ठिकाणी विराजमान आहेत.

ऐतिहासिक ठेव्याची पडझड

पूर्वी मंदिराच्या चार ते पाच एकराच्या परिसराला तटबंदी होती. चार दरवाजांतून आत प्रवेश मिळे. पण आता ही तटबंदी नामशेष झाली आहे. एकच दरवाजा मंदिराच्या समृद्धतेची साक्ष देत उभा आहे. जवळच अष्टकोनी छत्री असून तेथे अष्टविनायकाचे मंदिर आहे. या मंदिराचीही दुरवस्था झाली आहे. काही दानशूरांच्या सहकार्याने मंदिरात फरशी, पायऱ्या बसवण्यात आल्या; पण मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पक्का रस्ता नाही. पावसाळ्यात मात्र चिखल तुडवावा लागतो.
असे आहे मंदिर

महादेव मंदिरात शंकर-पार्वती शेजारी असतात; परंतु येथे महादेवाच्या अगदी विरुद्ध दिशेला पार्वती उभी आहे. देशभरात २ ते ३ मंदिरांतच शिव-पार्वती वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, असे ग्रामस्थ सांगतात. मंदिराचा परिसर अत्यंत नयनरम्य आहे. श्रावणात तर इथले सौंदर्य अधिकच बहरते. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर २०-२५ पायऱ्या आहेत. त्या उतरल्यावर शिव आणि पार्वतीची समोरासमोर मंदिरे आहेत.
पूर्वी महादेवाची पिंड दगडाची होती. काही वर्षांपूर्वी भाविकांनी यावर पंचधातूंचे आवरण चढवले आहे. पुढे ३० फूट खोल आणि ५० फूट रुंद असा एक आड आहे. आडाच्या एका बाजूने सुमारे ५० फूट उंच भिंत आहे. या भिंतीवर हत्ती मोट खेचून आडातून पाणी खेचायचे. या पाण्याने परिसरातील नागरिकांची तहान भागायची, असे भाविक सांगतात. या भिंतीवरच हनुमानाची छोटी मूर्ती आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, या सोहळ्याचे इतर फोटो आणि शेवटच्या स्लाईडवर या विवाह सोहळ्याचा VIDEO