आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जास्त पगारी शिक्षकांची मुले शिकतात कमी पगारी शिक्षकांकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शासकीय शाळेतील शिक्षणाच्या दर्जाबाबत विद्यार्थी आणि त्यांचे पालक नेहमीच तक्रार करीत असतात, हे सर्वज्ञात आहेच; पण जे शिक्षक शासकीय शाळांमध्ये शिकवतात तेही आपल्या मुलांना मात्र, तुलनेने कमी पगाराचे शिक्षक असलेल्या शाळांमध्ये पाठवतात. असे एक उदाहरणच ‘दिव्य मराठी’ने समोर ठेवले आहे. महापालिकेच्या शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षकाकडूनच त्याच्या पाल्याविषयी माहिती घेतली आहे. मात्र, कोणाचाही अपमान अथवा बदनामी करण्याचा हेतू नसल्यामुळे त्या शिक्षकाचे नाव मुद्दाम प्रसिद्ध केलेले नाही. त्या शिक्षकाचा मुलगा ज्या शाळेत इयत्ता ७वीत शिकतो ती इंग्रजी माध्यमाची शाळा असून सिडको भागात आहे. तिथल्याच शिक्षकाने त्यांच्या पगाराची आणि सोयी-सुविधांची माहिती दिली आहे. मात्र, ती अधिकृत व्यक्तीने प्रमाणित केली नसल्यामुळे त्या शाळेचे नाव देणेही टाळले आहे.
शिक्षकदिनी अशी तुलना करणे कदाचित शिक्षकांना आवडणार नाही; पण आम्ही हे चित्र दाखवले आहे ते केवळ शासकीय शाळेतील शिक्षकांनी आत्मपरीक्षण करावे, यासाठी. शासकीय शाळांमधील सर्वच शिक्षक दर्जेदार शिकवत नाहीत असे नाही हे खरे असले तरी बहुतांश शिक्षकांविषयीच्या या तक्रारीमुळेच शासकीय शाळांमध्ये विद्यार्थी येत नाहीत हेही नाकारता येत नाही. मुलांना इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण दिले तर ते भविष्यातील स्पर्धेत टिकू शकतील, हा त्यांना इंग्रजी खासगी शाळेत टाकण्याचा हेतूही असू शकतो. मात्र, मराठी माध्यमात ती ताकद नाही असे समजणे हाच या शिक्षकांचा पराभव नाही का? आपले मूल आपल्या शाळेत असेल तर आपल्या शिकवण्यात अधिक आत्मीयता येईल असा विचार शिक्षकांनी करावा, एवढाच हेतू आहे.
उपलब्धी मनपा शिक्षक खासगी शिक्षक
मासिक वेतन रु. ३२,०००रु. १७,०००
दिवाळी सुटी १५ दिवस १० दिवस
उन्हाळी सुटी ४० दिवस ३० दिवस
ख्रिसमस सुटी ०१ दिवस ०८ दिवस
केवळ आत्मपरीक्षणासाठी
शिक्षकांना पगार आणि सोयी-सवलती अधिक असूनही शिकवण्याचा दर्जा चांगला नसल्यामुळे शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या घटते आहे. दुसरीकडे खासगी इंग्रजी शाळांमध्ये शिक्षकांना पगार आणि सोयी-सवलती बेताच्याच असूनही तिथे शासकीय शाळेतील शिक्षकच आपल्या मुलांना शिकण्यासाठी पाठवतात, असा विरोधाभास आहे.
-संपादक
बातम्या आणखी आहेत...