आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Inspector 24 Km Cycling For Pollution Control Massage

पोलिस महानिरीक्षकांची जनजागृती,‘प्रदूषण टाळा’चा संदेश; 24 किलोमीटर सायकलिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद- विशेष पोलिस महानिरीक्षक अमितेशकुमार यांनी खुलताबाद ते म्हैसमाळ हा 12 किलोमीटरचा प्रवास कुटुंबीयांसह सायकलवर करून सर्वांना ‘प्रदूषण टाळा’चा संदेश दिला. पत्नी अपर्णा दोन्ही मुलांसह विक्रीकर उपायुक्त सुजित कक्कड, रंजित कक्कड यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांचा रॅलीत समावेश होता.

छंदातून संदेश
विशेषपोलिस महानिरीक्षक अमितेशकुमार यांनी गत आठवड्यातदेखील आैरंगाबाद ते दौलताबाद घाट अशी सायकल रॅली काढून प्रदूषण टाळाचा संदेश दिला होता. सायकलिंगची आवड असल्याने जनजागृतीसाठी सहकुटंुब रॅली काढल्याचे त्यांनी सांगितले.

तगडा बंदोबस्त
सकाळीसाडेसात वाजता विशेष पोलिस महानिरीक्षक अमितेशकुमार यांच्या तैनातीत मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. खुलताबाद ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तर सोबतही पोलिस कर्मचाऱ्यांचा पहारा होता. हे सर्व पाहण्यासाठी खुलताबादवासीयांनी चौकात मोठी गर्दी केली होती.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, प्लास्टिक पिशव्या जमा करत त्या कचऱ्यात टाकत प्रदूषण टाळा, सोबत स्वच्छतेचा संदेशही दिला....