आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : पंतप्रधानांच्या फुटबाॅल मिशनला विद्यापीठांकडून रेडकार्ड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद  - येत्या अाॅक्टाेबरमध्ये भारतात फिफाचा १७ वर्षांखालील मुलांचा फुटबाॅल वर्ल्डकप हाेणार अाहे. यासाठी देशभरात फुटबाॅलला चालना मिळावी यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या मार्गदर्शनखाली केंद्राकडून प्रसार अाणि प्रचारासाठी खास मिशन राबवण्याचा निर्णय घेतला. यासाठी राज्यात वेगवेगळ्या माेहिमा राबवल्या जात अाहेत. मात्र,  महाराष्ट्रात फुटबाॅलच्या प्रचार व प्रसाराला थेट विद्यापीठांकडून रेडकार्ड मिळत अाहे. राज्यातील १३ विद्यापीठांच्या निरुत्साहपणामुळ महिला फुटबाॅल बंद अाहेे. त्यामुळे प्रतिभावंतचे करिअर धाेक्यात अाले.
 
फुटबाॅल फेडरेशनची सहकार्याची तयारी 
महिलांच्या फुटबाॅल स्पर्धा अायाेजनात अडचणींचा सामना करावा असल्याचे सांगुन क्रीडा विभाग  कानाडाेळा करत अाहे. मात्र अांतर महाविद्यालयीन  स्पर्धेसाठी अावश्यक साेयी सुविधा पुरवण्याची तयारी  संघटनेने दिली. त्यामुळे अडसर सहज दूर हाेतील, असा विश्वास फिफाचे माजी संचालक माे. शेख यांनी व्यक्त केला.  
 
दरवर्षी १० राष्ट्रीय महिला साेडतात फुटबाॅल      
महिला विभागीय व राज्यस्तरावर अव्वल कामगिरीतून राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी हाेतात. मात्र, राष्ट्रीय स्पर्धेतील सहभागानंतर या १० महिला खेळाडूंना विद्यापीठांच्या दिरंगाईचा फटका बसताे. विद्यापीठांकडून महिला फुटबाॅल स्पर्धांचे अायाेजन केले जात नाही. त्यामुळे पदवीचे शिक्षण घेतानाच या महिला खेळाडूंना फुटबाॅल साेडून द्यावे लागते. त्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसते. 
 
वर्षाकाठी ६०० महिला फुटबाॅलपटू  
महाराष्ट्रामध्ये दरवर्षी ६०० महिला फुटबाॅलपटू विविध स्पर्धांच्या माध्यमातून मैदानावर अापल्या प्रतिभेला चालना देतात. राज्यातील ३१ जिल्ह्यांच्या या खेळाडूंमध्ये  तीन वयाेगटाचा समावेश अाहे. या महिला खेळाडू तालुका, जिल्हा, विभागीय, राज्य अाणि राष्ट्रीय स्पर्धेत दरवर्षी सहभागी हाेतात.
 
या विद्यापीठांची महिलांना अाडकाठी 
- डाॅ. बाबासाहेब अांबेडकर मराठवाडा विद्यापीठ, अाैरंगाबाद    
- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड  
- साेलापूर विद्यापीठ, साेलापूर 
- डाॅ. बाबासाहेब अांबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लाेणारे  
- वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी  
- महाराष्ट्र अाराेग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक  
- एसएनडीटी, मुंबई  
- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक  
- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी  
- पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकाेला  
- पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर  
- गाेंडवाना विद्यापीठ, गडचिराेली  
- बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापाेली  
 
> अांतर महाविद्यालयीन महिला फुटबाॅल स्पर्धेचे अायाेजन करणे सहज साेपे अाहे. यात रुची दाखवल्यास युवा खेळाडूंच्या प्रतिभेला चालना मिळते. शिस्तबद्धपणे महिला खेळाडूही सहकार्य करतात.   
-दिनेश पाटील, क्रीडा विभागप्रमुख, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
बातम्या आणखी आहेत...