आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPECIAL : कटू निर्णय; घरचा चारा नसेल तर खरेदी दर वाढूनही दूध व्यवसाय तोट्याचाच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यातील दुग्ध उत्पादकांच्या मागणीनंतर सरकारने दुधाचे दर लिटरमागे ३ रुपयांनी वाढवून दिले आहेत. आता गायीचे दूध २७ रुपये, तर म्हशीचे दूध ३६ रुपये लिटरप्रमाणे खरेदी होणार आहे. असे असले तरी घरचा चारा नसेल तर दरवाढ होऊनही दूध व्यवसाय तोट्याचाच असल्याचे आर्थिक गणित सांगते. पूर्वीच्या दरानुसार तोटा जास्त व्हायचा आता तो थोडा कमी झाला आहे. एवढाच दिलासा या दरवाढीतून शेतकऱ्यांना मिळाल्याचे चित्र आहे.  
 
शेतकरी कर्जमाफीसाठी झालेल्या संप-आंदोलनात दुधाचे भाव वाढवावेत ही प्रमुख मागणी होती. त्या मागणीचा विचार करून राज्य सरकारने २१ जूनपासून दूध खरेदीच्या दरात वाढ केली. शासन आदेशानुसार गायीच्या ३.५ फॅट आणि ८.५ टक्के एसएनएफ दर्जाच्या दूध खरेदी दरात लिटरमागे ३ रुपये वाढ करण्यात आली असून आता खरेदी दर २७ रुपये एवढा करण्यात आला आहे, तर म्हशीच्या ६.० फॅट आणि ९.० एसएनएफ गुणप्रतीच्या दुधाचा खरेदी दर ३६ रुपये करण्यात आला आहे. तसेच ६.१ ते ७.५ प्रति पॉइंट वाढीव फॅटसाठी ३० पैसे वाढ कायम ठेवण्यात आली आहे.  
 
खासगी डेअरीत जास्त भाव :  राज्यात अनेक ठिकाणी खासगी डेअरी, सहकारी  संघ आहेत. त्या दुधाला शासनापेक्षा जास्त दर देतात. नामांकित डेअरी कंपन्या लिटरमागे ४० ते ४२ रुपये देऊन म्हशीचे दूध खरेदी करतात. गायीच्या दुधाला ३० रुपयांपर्यंत भाव देतात.
 
तोट्याचा व्यवसाय
माझ्याकडे ३०पंढरपुरी म्हशी आहेत. प्रत्येक म्हशीला दररोज १५० रुपयांची वैरण, १०० रुपयांची पेंड, ४० रुपये माणसाची मजुरी, ४० रुपये औषधपाणी असा ३२५ ते ३४० रुपये खर्च येतो. दररोज एक वेळेला लिटरप्रमाणे लिटर दूध मिळते. त्याची विक्री केल्यास २८८ रुपये मिळतात. तेही फॅट बरोबर असतील तर. घरातील एक व्यक्ती पूर्णवेळ यासाठी काम करणारी घरचा चारा असेल तर हा व्यवसाय परवडतो. 
- प्रकाश पवार, दूध उत्पादक शेतकरी, उस्मानाबाद 
बातम्या आणखी आहेत...