आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : भारतीयांचा मेंदू युरोपियन, चिनी माणसांपेक्षा वेगळा; तज्ज्ञांना नवी दिशा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युरोपियन मेंदू, भारतीय मेंदू, चिनी मेंदू - Divya Marathi
युरोपियन मेंदू, भारतीय मेंदू, चिनी मेंदू
औरंगाबाद - सर्व मानवांचा मेंदू एकसारखा असतो या वैश्विक विश्वासाला औरंगाबादच्या डाॅक्टर संशोधकामुळे तडा गेला आहे. भारतीय मेंदू युरोपियन व चिनी मेंदूपेक्षा वेगळा असतो, हे डाॅ. रश्मीन अचलिया यांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे मेंदूविकाराच्या उपचार पद्धतीत अामूलाग्र  बदल होत आहे.
 
डॉ. अचलिया यांनी बंगळुरू येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेन्टल हेल्थ अॅन्ड न्यूरोसायन्स (निम्हान्स) येथे हे संशोधन केले. डाॅ. नरेन राव आणि डाॅ. गरिमा अचलिया यांचाही यात सहभाग होता. निम्हान्सच्या १३० जीबी रॅम असलेल्या महासंगणकावर त्यांनी अनेक गुंतागुंतीची गणिते करत हे संशोधन केल्याचा दावा त्यांनी केला आहे. भारत, चीन आणि युरोपमधील मनोविकार असलेल्या अनेक रुग्णांच्या मेंदूचे स्कॅनिंग या संशोधनासाठी करण्यात आले. त्यातून भारतीय माणसांचा मेंदू स्कॅनिंग केल्यावरही खूप वेगळा दिसतो, हे डाॅ. रश्मीन यांनी सिद्ध केले. भारतीय मेंदूची लांबी, रुंदी व उंची युरोपीय आणि चिनी मेंदूपेक्षा वेगळी असते, भारतीयांच्या भावना या प्रांतातील लोकांच्या भावनांपेक्षा वेगळ्या असतात, असा निष्कर्ष डाॅ. रश्मीन यांनी काढला. त्यांचे हे संशोधन अमेरिकेच्या सायकॅट्रिक रिसर्च न्युरोइमेजिंग जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. यातील संदर्भ घेण्यासाठी ३५ डाॅलर शुल्क भरावे लागते. डाॅ. अचलिया यांना २०१२ मध्ये हाॅर्वर्ड युनिव्हर्सिटीचा यंग सायंटिस्ट तर २०१५ मध्ये बायपोलर डिसआॅर्डरवरील संशोधनासाठी सॅम्युअल गेरशान हे पुरस्कार आतापर्यंत मिळाले आहेत.
 
भारतीय मेेंदू वैविध्यपूर्ण..
युरोपीय व चिनी माणसांपेक्षा भारतीय माणसाचा मेंदू आकाराने लहान आहे.भारतीय मंेदूत वैविध्य तुलनेने जास्त आहे. जसे एखाद्या भारतीय शेतकऱ्याचा मेंदू व उच्चशिक्षिताचा मेंदू यात असे वैविध्य असल्याचे प्रथमच समोर आले.भारतीय मंेदू आकाराने लहान असल्याने त्याचे आलेखीय विश्लेषण तुलनेने गुंतागुंतीचे आहे. भारतीय मेंदू आकाराने लहान असला तरी तो गुणवत्तेच्या बाबतीत कोठेही कमी पडत नाही.
बातम्या आणखी आहेत...