आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालण्याने छळले होते, तासांच्या शस्त्रक्रियेने केली सुटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- हृदयाकडून पायाकडे शुद्ध रक्तपुरवठा करणाऱ्या अॅर्व्हटो रक्तवाहिनीत (महारोहिणी)अडथळा निर्माण झाल्याने ४० वर्षांच्या तुकाराम राठोड यांना चार पावले चालणेही अशक्य झाले होते. मुंबईच्या जे.जे. रुग्णालयातही राठोड यांच्या पदरी निराशा आली. शेवटी ते घाटीत आले. शुक्रवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. हृदयरोग विभागाचे डॉ. सदानंद पटवारी यांनी डॉ. आनंद बीडकर यांच्या सहकार्याने शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली...आणि राठोड यांना दिलासा मिळाला.
डॉक्टरांनी काय केले
किडनीच्या खाली जांघ मांडी या भागात झालेले ब्लॉकेज वाय ग्राफ्ट टाकून बायपास केले. त्यामुळे पायाला होणारा रक्त पुरवठा सुरळीत झाला. याला अॅर्व्हटो बायफिमोरल बायपास ग्राफ्ट असे म्हणतात.
नेमके काय झाले होते
हृदयाकडून शुद्ध रक्ताचा पुरवठा संपूर्ण शरीराला करणारी अॅर्व्हटो ही वाहिनी आहे. तिच्या दोन शाखा इलियाक आर्टरीज(रोहिणी रक्तवाहिनी) किडणीकडून दोन्ही पायांमध्ये जातात. अनेक वर्षांपासून विडी ओढण्यामुळे राठोड यांच्या पायाला रक्तपुरवठा करणारी वाहिनी निकामी झाली होती. पायाकडे होणारा रक्तपुरवठा ठप्प झाला होता.

विडीमुळे अरिष्ट
- विडी,तंबाखू,सिगारेटचे व्यसन असलेल्यांना हा त्रास होतो.
डॉ. आनंद बीडकर, शस्त्रक्रिया विभाग
राजीव योजनेचा लाभ
- राजीव गांधी योजनेमुळे शक्य झाले. शेतीवर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. ही शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयात केली असती तर ते लाख खर्च आला असता.
अनिल राठोड, रुग्णाचा मुलगा
रुग्णाची काळजी
शस्त्रक्रियेसाठी डॉ. पटवारी सकाळी ८.३० ते रात्री ११. ३० वाजेपर्यंत उपस्थित होते. १० वाजता सुरू झालेली शस्त्रक्रिया वाजता संपली. वाजता रूग्ण शुद्धीवर आल्यावरही निरिक्षणासाठी डॉक्टर विभागात होते. त्रिवेंद्रमहून आलेल्या डॉ. पटवारी यांनी ऑक्टोबरपासून विविध अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करून रूग्णांना दिलासा दिला आहे.
का गुंतागुंतीची शस्त्रक्रिया ?
हृदयसंपूर्ण दाबाने सुरु असताना छाती आणि पोटामध्ये जागा करत अॅर्व्हटोला हा ग्राफ्ट बसवायचा असतो. यामध्ये किंचितही चूक झाल्यास हृदयातून रक्तस्त्राव होऊन रूग्ण टेबलावरच दगावू शकतो.
बातम्या आणखी आहेत...