आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोळा विशेष: श्रमसंस्कृती लोप पावतेय; आदर्श गाव पाटोद्यातील बैलजोड्यांची संख्या ९० टक्क्यांनी घटली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बैलजोडीअन् बळीराजाचे नाते एकेकाळी अतूट होते. प्रत्येक शिवारात अन् दारात ढवळ्या-पवळ्याची जोडी असायची, पण आता हे चित्र पूर्णत: बदलले आहे. बैलजोडी पोसायला शेतकऱ्यांजवळ वेळ नाही अन् पैसाही नाही. बदलत्या जमान्यात बैलांच्या श्रमाचे महत्त्वच संपले आहे. श्रमसंस्कृती लोप पावतेय. स्मार्टवर्कला मिळणाऱ्या प्रतिष्ठेमुळे बैलजोडी विकून ट्रॅक्टर घ्यावे लागत आहे. पोळ्याचा सण पूर्वी महनिाभर चालायचा. आता पोळ्याच्या दिवशी सुद्धा सणासारखे वाटत नाही, अशी खंत बळीराजाला वाटत आहे.
आज, सोमवारी पोळा आहे. मात्र यंदा दुष्काळाचे सावट या सणावर आहे. याचे औचित्य साधून ‘दिव्य मराठी’ने औरंगाबादपासून १५ कि.मी. अंतरावरील पाटोदा या आदर्श ग्राम पुरस्कारप्राप्त गावातील शेतकऱ्यांना बोलते केले. तेव्हा बैलांच्या श्रमाला मिळणारी प्रतिष्ठा कमी झाल्याची आणि एकूणच बैलांचे अस्तित्व संकटात असल्याचे जाणवले.
पाटोदामध्ये ३० वर्षांपूर्वी १५०० बैलजोड्या म्हणजे तब्बल तीन हजार बैल होते. आता केवळ २१ बैलजोड्या आहेत. काळ, काम आणि वेगाच्या जमान्यात यांत्रिकीकरणाचा बोलबाला सुरू असल्याने बैलांच्या श्रमाचे महत्त्व कमी झाले आहे. शिवाय बैलजोडीचा महनि्याचा खर्च सात ते आठ हजार रुपये आहे. इथे माणसांनाच जेवण मिळत नाही तर जनावरांना खायला द्यावे काय? दुष्काळात बैलांचे हाल होतात. मात्र, ट्रॅक्टरसारख्या यंत्राला जेव्हा काम तेव्हाच इंधन लागत असते. शिवाय कामे झटपट करता येतात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
सजावटीचेसाहित्य महागले..आता प्रतीकात्मक पूजा : शेतकरीम्हणतात..,पूर्वी महनिाभर पोळ्याची तयारी चालायची. रंगीबेरंगी दोऱ्या वळणे, कासरे, माथ्या, मोटकी, नक्षीदार झुली, आकर्षक गोंडे आम्ही हाताने तयार करायचो. घागरमाळा फक्त तेवढ्या विकत आणल्या जायच्या, पण आता सर्वच सजावटीचे साहित्य रेडिमेड मिळतात. तेही खूप महाग आहे. एक बैलजोडी चांगली सजवायची असेल तर आता किमान हजार रुपये खर्च येतो. पूर्वी घरातले सर्वजण ही तयारी करीत. कवड्यांचे दागिने घराघरांत स्वत: तयार करायचे. आता गावात ज्यांच्याकडे बैलजोडी आहे ते रेडिमेड मोजकेच साहित्य आणतात. बाकीचे शेतकरी मात्र आता मातीच्या बैलांची प्रतीकात्मक पूजा करतात.
बैलांचीसंख्या दहा पटींनी घटली
पाटोदागावात १९८५ पर्यंत १५०० बैलजोड्या होत्या म्हणजे एकूण ३००० बैल होते, पण गेल्या ३० वर्षांत ही संख्या चक्क दहा पटींनी घटली आहे. त्याऐवजी आता बड्या शेतकऱ्यांच्या मळ्यात दारांत एक मोठा ट्रॅक्टर हटकून असतोच, पण हे चित्र आहे थोडा फार पैसा असणाऱ्या शेतकऱ्यांचे. गरीब शेतकरी आजही ४०० ते ५०० रुपये भाड्याने बैलजोडी घेतो. अनेकांना तेही परवडत नाही, अशी अवस्था गावोगाव पाहायला मिळते.
खर्चही आवाक्याबाहेर : बैलजोडी विकत घ्यायची म्हटले तर कमीत कमी चाळीस हजारांपासून सुरुवात होते, पण चांगली उत्तम दर्जाची जोडी ही लाख रुपयांना मिळते, असे शेतकरी सांगतात. एक बैलजोडी पोसायची म्हणजे महनि्याकाठी सात ते आठ हजार खर्च येतो. आता सधन अन हौशी शेतकरीच करतो.

पाटोद्यातील शेतकऱ्याने पोळ्यानिमित्त लाडक्या बैलास असे सजवले आहे. त्यासाठी विविध साहित्‍य खरेदी केले आहे.
उरल्या फक्त आठवणी
*पूर्वीआमच्या गावात पंधराशे बैलजोड्या होत्या. महिनाभर पोळ्याची तयारी चालत असे, पण आता बैलजोड्याच शेतकऱ्यांनी विकून टाकल्याने गेल्या पंधरा वर्षांत हे प्रमाण ९० टक्क्यांनी घटले. आता गावात बैलजोड्याच दुर्मिळ झाल्या. अप्पासाहेबडोळस, शेतकरी
श्रमाचेमहत्त्व संपले
*श्रमाचेमहत्त्वच आता संपले, स्मार्टवर्कचा जमाना आल्याने झटपट कामे करणारे मशीन आता बळीराजाचा मित्र बनले आहे. पूर्वीची ढवळ्या- पवळ्याची जोडी नामशेष होते आहे. कल्याणपेरे, शेतकरी
शेतीलाआता दुय्यम दर्जा
*पूर्वीउत्तम शेती, मध्यम व्यापार अन कनिष्ठ नोकरी असे समजले जायचे. आता चित्र बदलले आहे. शेतीला कनिष्ठ स्थान आल्याने सर्जा-राजाचे हाल सुरू झाले ते पाहावेना म्हणून त्यांना विकावे लागले. सोमीनाथपेरे, शेतकरी
खर्चाचेगणितच संपले
*एकबैलजोडी जरी असली तरी तिला चारा-वैरण खूप लागते. दररोज शेतात सकाळ, संध्याकाळ त्याच्यासाठी चकरा माराव्या लागतात. त्या चकराच आता संपल्या आहेत. हे खर्चाचे गणितच संपले. आर.डी. चौधरी, ग्रामविकासअधिकारी, पाटोदा