आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची ‘दिव्य मराठी’शी खास बातचीत..

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : शुक्रवारची प्रसन्न सकाळ. देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकरही प्रसन्न मूडमध्ये. औरंगाबाद शहर आरामासाठी, शीण घालवण्यासाठी अगदी उत्तम आहे...अजिंठा-वेरूळसह आसपासची सर्व पर्यटनस्थळे पाहण्यासाठी येथे यावे लागेल. पाच-सहा दिवस राहणार आहे... अशा शब्दांत रिलॅक्स मूडमधील पर्रीकरांनी आपल्या भावना खास ‘दिव्य मराठी’जवळ व्यक्त केल्या. या वेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभूही उपस्थित होते.

अशा रंगल्या गप्पा....
*प्रतिनिधी : (मनोहर पर्रीकर यांना) औरंगाबाद कसे वाटले?
पर्रीकर : औरंगाबादला यापूर्वी येऊन गेलो आहे. या शहारात एकदा आराम करण्यासाठी येणार आहे. येथील पर्यटनस्थळे खास करून अजिंठा-वेरूळ एकदा बघायला येणार आहे. आराम करण्यासाठी हे शहर छान आहे.
*प्रतिनिधी : म्यानमारमध्ये जी कारवाई केली त्यातून वेगळा संदेश गेला ?
पर्रीकर : म्यानमारबद्दल मी इथे काही बोलणे योग्य नाही. माझ्याकडे अत्यंत जबाबदारीचे खाते आहे.
*प्रतिनिधी : औरंगाबादसाठी संरक्षण विभागाच्या काही नव्या योजना तुम्ही आखल्या आहेत काय?
पर्रीकर : औरंगाबादमधून संरक्षण विभागाला लागणारे उत्पादन तयार करण्याची योजना आहे. ऑटो क्लस्टरच्या माध्यमातूनही संरक्षणविषयक यंत्रासामग्री तयार करण्याचा विचार आहे. तसेच सैनिकी शाळा अपग्रेडचे काम लवकरच सुरू होईल. अकोला येथे नवीन सैनिकी शाळा सुरू करण्यात येणार आहे.
*प्रतिनिधी : (सुरेश प्रभू यांना) रेल्वे विकासात मराठवाड्यावर सतत अन्याय झालाय, तुमच्या कडून खूप आशा आहेत...
प्रभू : अगदी बरोबर आहे. जनतेच्या आशांचा मी पूर्ण आदर करतो, पण मला थोडा वेळ जनतेने द्यावा.
*प्रतिनिधी : मराठवाड्यासाठी काय योजना आहे? नवे मार्ग, नव्या गाड्या..या शहरातून मुंबईसाठी काही जादा गाड्या हव्यात..?
प्रभू : (स्मितहास्त करीत) पाहिजे तर आताच मी सर्व मार्ग तयार करून देतो. अगदी दोनच मिनिटांत..... चालेल काय..? अहो, आम्ही आता कुठे सत्तेवर आलोय. अजून थोडा काळ थांबावे लागेल. खूप काही करायचे आहे. त्याची सुरुवात मनमाड येथून करतो आहोत. मनमाड ते मुदखेडचा मार्ग प्रथम मोठा केला जाणार आहे. तो झाला की मग बाकी कनेक्टिव्हिटीचे बघू. येत्या तीन ते पाच वर्षांत तुम्हाला कामाची प्रगती दिसेल. कारण, रेल्वेचे कोणतेही काम इतके सोपे नाही.
बातम्या आणखी आहेत...