आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खास विद्यार्थ्यांसाठीच हवामान केंद्र!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - हवामान,खगोलशास्त्र विषयाचे विद्यार्थी नागरिकांना हवामानाचा अभ्यास करता यावा यासाठी सिडको एन-४ येथील महर्षी विद्यालयात पंधरा दिवसांत हवामान केंद्र कार्यान्वित होत आहे. विज्ञान विभागाचे शिक्षक आणि विद्यार्थी दरररोज तापमान, पर्जन्यमान, आर्द्रता, वाऱ्याची दिशा, वेग, सूर्योदय, सूर्यास्ताच्या नोंदी घेणार आहेत.

महर्षी विद्यालयातील विद्यार्थ्यांना भाषा, विज्ञान, हवामान, खगोलशास्त्र, जीवशास्त्र, भूगोल आदी विषयांचे परिपूर्ण ज्ञान मिळावे. या सर्व विषयांत त्यांची रुची वाढावी. समृद्ध पर्यावरण, समाज हित जपणारे विद्यार्थी नागरिक घडावेत, अशी विविध उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून साहित्य मंडळ, विज्ञान मंडळ आणि खगोलशास्त्र मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. आता विद्यालय व्यवस्थापनाने हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. अंबाला येथून उपकरणे मागवली अाहेत. आठ दिवसांत ती उपलब्ध होऊन पंधरा दिवसांतच हवामान केंद्र कार्यान्वित होणार असल्याची माहिती विद्यालयाचे सचिव डी. एल. पदे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.
शहर परिसरातील हवामानाची नोंदीसाठी सर्वप्रथम स्वतंत्र चिकलठाणा वेध शाळा सुरू झाली. येथूनच कृषी, विमान, उद्योग, ग्रामस्थ शहरवासीयांना हवामानाचा अंदाज कळवला जातो. अनेक वर्षांनंतर मंडळनिहाय हवामान केंद्रे स्थापन झाली. पण येथील नोंदी घेण्यासाठी कुशल मनुष्यबळ नाही. केवळ पावसाच्या नोंदी घेतल्या जातात. मात्र, आजच्या पावसाची माहिती जिल्हा प्रशासन दुसऱ्या दिवशी जाहीर करते. वाल्मीत पर्जन्यमानाच्या नोंदी घेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. त्यांच्यासाठीच याचा उपयोग केला जातो. जुलै रोजी एमजीएम संस्थेने प्रथमच अत्याधुनिक स्वयंचलित हवामान केंद्र सुरू केले आहे. चिकलठाणा वेध शाळेपेक्षा या तंत्रज्ञानाची क्षमता जास्त आहे. शहर तालुक्यातील ८० टक्के भागाची माहिती संकलित करण्याची क्षमता या केंद्रात आहे.

१६०० केंद्रे कागदावरच
सरकारने महाराष्ट्रात १६०० स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मान्सूनपूर्वी ती कार्यान्वित होणे अपेक्षित होते. यासाठी टेंडरही काढल्याची माहिती राज्य कृषी आयुक्त विकास देशमुख, तत्कालीन कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली होती. प्रत्यक्षात पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला तरी अद्याप केंद्र उभारण्याचे काम सुरू झाले नाही.

हे आहे वास्तव
बहुतेक शाळांत हवामान विषयाचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी पर्जन्यमापक, हवेचा वेग, दिशा, तापमानाची नोंद घेणारे तंत्रज्ञान नाही. पुस्तकातूनच विद्यार्थ्यांना शिकवले जाते. यातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञान मिळत नाही. या विषयातील तज्ज्ञ शिक्षकांचा अभाव असल्याने बहुतांश विद्यार्थी विज्ञान, हवामान, खगोलशास्त्र विषयात मागे आहेत. जिल्ह्यात भाषा, गणित, विज्ञानच्या दोनशे शिक्षकांची उणीव आहे.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन
नागरिकांसाठी विशेष वर्ग भरवून त्यांना चंद्र, सूर्यग्रहण, पृथ्वीचे भ्रमण, वातावरणाचा परीघ, घटक, नक्षत्र, ग्रह, सर्वात लहान सर्वात मोठा दिवस आदीची तज्ज्ञांमार्फत माहिती दिली जाईल, असे पदे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...