आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघाताला ‘स्पीड’ देणारे स्पीडब्रेकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महत्त्वाच्या रस्त्यांवर गतिरोधक (स्पीडब्रेकर) असायला हवेत, मात्र त्यांचे काही नियम ठरवून देण्यात आले आहेत. या नियमांना फाटा देत शहरात वाट्टेल त्या ठिकाणी वाट्टेल तितके आणि वाट्टेल त्याने गतिरोधक टाकून ठेवले आहेत. विशेष म्हणजे बरेच गतिरोधक हे नागरिकांनी वा त्या त्या भागातील संस्थांनी स्वत: टाकले आहेत. त्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतलेली दिसत नाही. यामुळे वाहनधारकांना अडचणी येतात.
उंची, रुंदी आणि प्रकार यानुसार कसे गतिरोधक असावेत याचे नियम ठरलेले आहेत. पण त्याचा विचार करता शहरात मुख्य रस्ता असो की अंतर्गत, हायवे असो की अन्य कुठला रस्ता.. सर्व नियम धाब्यावर बसवत वाटेल तसे गतिरोधक टाकून ठेवण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांत शहरात जीवघेणे अपघात घडले आहेत. गुरुवारीही क्रांती चौक उड्डाणपुलावर भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. खरे तर गतिरोधक हे अपघात टाळले जावेत म्हणून असतात. पण प्रत्यक्षात शहरात सर्वत्र असलेल्या सदोष गतिरोधकांमुळे नेमके याच्या उलट घडते. वाहने तर खराब होतातच, वर वाहनधारकांनाही इजा होते. त्यावर टाकलेला प्रकाश...
हे आहेत चुकीचे गतिरोधक: शहरातविद्यापीठ, रोशन गेट, एमजीएम, जवाहर कॉलनी, पाणचक्की, टीव्ही सेंटर, कटकट गेट, कलेक्टर ऑफिस चौक या ठिकाणी पाहणी केली. या भागातील गतिरोधक चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले.

मनपाची जबाबदारी : नागरिकांनाकोठेही गतिरोधक बसवण्याची गरज भासल्यास त्यांनी नियमाप्रमाणे अर्ज करणे गरजेचे आहे. पण त्यासाठी त्यांनी वाहतूक विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. यानंतर मनपात मंजुरीचा अर्ज सादर करावा. मनपा त्या वाहतूक पॉइंटची तपासणी करून गरजेनुसार कसे गतिरोधक हवे तसे काम करते. ही संपूर्ण जबाबदारी मनपाची आहे.
असे भयंकर गतिरोधक खूप धोकादायक अाहेत. त्यावरून चारचाकी जाताना तर सस्पेन्शनमुळे गाडी घासते आणि खराब होते.

खराब रस्ता त्यावर खराब सदोष गतिरोधक. त्यावरून हिसके बसतात. शिवाय हे गतिरोधक आणखी मोठे असल्यास वाहने अक्षरश: पडतात.

^ गरज असेल तेथे गतिरोधक बांधून देण्याची जबाबदारी मनपाची आहे. नागरिकांनी वाहतूक विभागाची परवानगी घेऊन आमच्याकडे गतिरोधक बांधून देण्याची मागणी करावी. गरजेनुसार ते बांधून दिले जातील. एस.व्ही. चामले, इंजिनियर,मनपा
ढोबळ नियम
गतिरोधकांची उंची एक ते तीन इंच असावी असा नियम आहे. कारण भारतीय बनावटीच्या दुचाकी चारचाकी वाहनांची दोन चाकातील उंची ही साधारण ते इंचांपर्यंत असते. विशेषत: महिला ज्या गाड्या वापरतात त्या हलक्या कमी उंचीच्या असतात. त्यामुळे मोठ्या गतिरोधकावरून गाडी गेल्यास ती खाली लागून गाडी डॅमेज होण्याचे प्रकार घडतात. याला खर्चही मोठ्या प्रमाणात येतो. अशीच अवस्था चारचाकींची आहे.

नेमका कसा असावा गतिरोधक ?
{गतिरोधका वरून वाहन जात असताना किमान दोन ते तीन फुटांचा स्लोप गतिरोधकाला असावा. हा गतिरोधक शाळा, महाविद्यालय किंवा मुलांची वर्दळ असेल अशा ठिकाणी केला जातो. मुख्य हायवे किंवा वर्दळ असलेल्या रस्त्यांवर पांढरे पट्टे असलेले दिशादर्शक गतिरोधक असावेत. तसेच पांढरे किंवा पिवळे लेअर असलेल्या रंगाचे पट्टे असलेले दुभाजक असावेत. याखेरीज तयार केलेले कुठलेही गतिरोधक अनधिकृत धोकादायक असतात. त्यासाठी पुढील नियमांचाही अवलंब केला जावा.

{ वाहतूक होणारा रस्ता कोणत्या पद्धतीचा आहे यावर गतिरोधक बसवण्यात येतात. रस्ता हायवेचा असल्यास तसेच वाहनाचा वेग ताशी ६० किमी असल्यास पांढऱ्या पट्ट्यांच्या माध्यमातून वेग कमी केला जातो.

{ औरंगाबाद शिर्डी रोड खुलताबाद रोडवर आपल्याला नवीन पद्धतीचे गतिरोधक, जे इंच उंची आठ इंच लांबीचे आहेत. एकाच वेळी सुमारे १५ पट्ट्या मारलेल्या आहेत.
{ औरंगाबाद शहरात अंतर्गत वाहतुकीसाठी खुल्या असलेल्या रस्त्यांवर गतिरोधक करण्यासाठी साधारण इंच उंचीचा उपयोग करण्याचा नियम आहे. यापेक्षा अधिक मोठा गतिरोधक करायचा असल्यास त्या टू स्लोप पद्धतीने बांधण्याचा नियम आहे. जसे चारचाकी दुचाकी वाहनाचा गॅप लक्षात घेता गतिरोधकांच्या उंचीइतका तो गतिरोध टू स्लोपनुसार दुप्पट रुंदीचा असावा. मात्र, असे गतिरोधक तयार करण्यात आलेले नाहीत. औरंगाबाद शहरात सध्या गतिरोधकाऐवजी पांढऱ्या पट्ट्यंाचा उपयोग केला जातो.

{ नॅशनल हायवेवर शाळा, गाव असल्यास गतिरोधक बसवण्यास परवानगी दिली गेली आहे. या ठिकाणी अर्धा फूट लांबीच्या अतंरावर ते इंच इतक्या उंचीचे सलग गतिरोधक, ज्यात २० सेंटिमीटरचा गॅप असावा. या गतिरोधकाची सूचना वाहनधारकांना सूचना फलकाच्या माध्यमातून ५०० मीटर अंतर अगोदर दर्शवली जाते.