आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांत्रिक बिघाडामुळे स्पाइस जेटच्या दिल्ली विमानाला चार तास उशीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दुपारी 12 वाजता औरंगाबादेतून दिल्लीकडे जाणारे स्पाइस जेटचे एसजी-172 विमान सायंकाळी चार वाजता रवाना झाले. प्रवाशांनी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीला दिलेल्या माहितीनुसार 11 वाजून 20 मिनिटांनी हे विमान दिल्ली येथून चिकलठाणा विमानतळावर उतरले. 12 वाजून 20 मिनिटांनी ते दिल्लीकडे जाणार होते. मात्र, काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाने सांगितले. त्यामुळे उड्डाण घेण्यापूर्वीच ते धावपट्टीवर थांबवण्यात आले.
विमानतळावरील तंत्रज्ञांनी दुपारी पावणेचार वाजेपर्यंत बिघाड दुरुस्त केला. त्यानंतर ते रवाना झाले. दरम्यान, वेळापत्रकापेक्षा चार तास उशीर झाल्याने संतापलेल्या प्रवाशांची स्पाइस जेटच्या अधिकार्‍यांशी वादावादी झाली. तिकिटाची रक्कम परत देण्यासाठी आग्रह धरला तेव्हा 1500 रुपये परत देण्याची तयारी अधिकार्‍यांनी दाखवली. 24 प्रवाशांनी पैसे परतही घेतले. मात्र, उर्वरितांना दिल्लीला जाणे आवश्यक असल्याने त्यांनी नाइलाजाने विमानात बसण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात स्पाइस जेटचे स्थानिक अधिकारी अजय चिब यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बिघाडाविषयी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. विमान उशिरा निघाले आणि सुखरूप दिल्लीला पोहोचले, एवढेच त्यांनी सांगितले.

(फोटो - संग्रहित छायाचित्र)