आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामे घुसडली; बजेट संकटात, १७१ कोटींच्या स्पिलच्या कामांत १४ कोटींची कामे ड्रेनेजचीच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मागील काळात अर्थसंकल्प फुगवताना घुसवलेली कामे आता मनपालाच संकटात टाकणारी ठरली आहेत. यातील बहुतेक कामे स्पिल ओव्हरमध्ये (गेल्या काही वर्षांत रखडलेली) आली असून हा आकडा १७१ कोटींच्या घरात पोहोचला आहे. मनपाच्या तिजोरीचा जीव साडेतीनशे कोटींच्या आसपास असताना आता स्पिलची कामे त्याच्या निम्म्या आकाराची झाली आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात या स्पिल ओव्हरच्या कामांत फक्त ड्रेनेजच्याच १४ कोटी २५ लाख २० हजार रुपयांच्या कामांचा समावेश आहे.

महापालिकेचा २०१५-१६ चा अर्थसंकल्प स्पिल ओव्हर अर्थात मागील पानावरून पुढे चालू या धोरणाच्या विळख्यात सापडल्याचे दिसत आहे. मागील काळात दरवर्षी अर्थसंकल्पात नवनवीन कामे घेण्यात आली. अनेक कामे सुरू होऊन पूर्ण झाली. काही कामांचे कार्यादेश निघाले, पण काम सुरू झाले नाही. काही कामांचे अंदाजपत्रक तयार झाले, पण पुढे घोडे सरकले नाही. जी कामे पूर्ण झाली त्यांची बिले निधीअभावी निघाली नाहीत. त्यामुळे ही सगळी कामे मागील वर्षातून पुढील वर्षात ढकलली गेली. ती साचत साचत आता १७१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहेत. इन मीन साडेतीनशे कोटींचा जीव असलेल्या मनपाच्या तिजोरीच्या निम्मा भार आता स्पिल ओव्हरच्या कामांचाच झाला आहे.

स्पिल ओव्हरचे भूत शहराच्या विकासाच्या मानगुटीवर बसले असून त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. यंदा मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात तब्बल १४ कोटी २५ लाख रुपयांची
ड्रेनेजची कामे
वाॅर्ड: कोटी २७ लाख २५ हजार
वाॅर्ड : कोटी ७५ लाख ४५ हजार
वाॅर्ड : कोटी ७८ लाख ६५ हजार
वाॅर्ड : कोटी २९ लाख ३५ हजार
वाॅर्ड : ८९ लाख १५ हजार
वाॅर्ड : कोटी ६८ लाख १० हजार

कामे केलेली नाहीत
याकामांत किरकोळ ड्रेनेज देखभालीपासून मोठमोठ्या ड्रेनेजलाइनची कामे टाकण्याच्या कामांचाही समावेश आहे. जी कामे झाली आहेत त्यांची बिले देणे बाकी आहेत. दुसरा प्रकार हा कार्यादेश देऊन सुरू झालेल्या कामांचा आहे. त्यात अनेक कामे ही ठेकेदाराने आधीची बिले मिळाली नसल्याने ती कामे सुरू केलेली नाहीत, तर कार्यादेश मिळायला उशीर झाल्याने वाढीव दर द्यावा यासाठी ठेकेदार अडून बसले आहेत.