आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंधरा लाखांचे स्पिरिट जप्त; सहा जण अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पिरिटची वाहतूक करणारा ट्रक. - Divya Marathi
स्पिरिटची वाहतूक करणारा ट्रक.
औरंगाबाद- बनावटदारू तयार करण्यासाठी लागणारे १५ लाख रुपये किमतीचे स्पिरिट (मद्यार्क) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी जप्त केले. वाळूज येथील एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कार्यालयावर मारलेल्या धाडीत हा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. नामांकित मद्य उत्पादक कंपन्यांच्या मालाची नक्कल करण्यासाठी हे मद्यार्क शहरात आणले असावे, असा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचा कयास आहे. हे एक मोठे रॅकेटच असून परराज्यातही त्याचे धागेदोरे असण्याची शक्यता राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सी. बी राजपूत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत वर्तवली.

वाळूज परिसरात शनिवारी बनावट दारू बनवण्यासाठी लागणारे स्पिरिट येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक शिवाजी वानखेडे यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यामुळे छापा मारण्यासाठी तीन पथके तयार करण्यात येऊन एकाच वेळी तीन ठिकाणी छापे मारण्यात आले. पहिला छापा व्ही ट्रान्सपोर्टवर मारला गेला. त्यात ३६ बॅरल (२०० लिटर) स्पिरिट सापडले. दुसऱ्या पथकाने एमएच १४ डीएम १०९ या क्रमांकाचा ट्रक पकडला. त्यात ५० लिटर क्षमतेच्या २५ कॅनमध्ये १२५० लिटर स्पिरिट होते. या ट्रकमध्ये इतर कंपन्यांचे साहित्य होते. त्यामागे या बॅरल दडवून ठेवल्या होत्या. तिसरा छापा लालजी मूलजी ट्रान्सपोर्टवर मारून तेथे १०० लिटर स्पिरिट जप्त करण्यात आले.

सहाजणांवर कारवाई
राज्यउत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी ट्रान्सपोर्टचालक, वाहनचालकासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पैकी महेंद्रकुमार उमाशंकर पाठक (रा. उत्तर प्रदेश), ट्रकचालक दादासाहेब भागवत ढोकणे हे दोघे आरोपी असून इतर आरोपींची नावे गोपनीय ठेवण्यात आली अाहेत. ही कारवाई शिवाजी वानखेडे यांच्यासह शरद फटागंडे, के. पी. जाधव, गणेश पुसे, ए. बी चौधरी, बी. आर नवले, सुशील चव्हाण, रतन फुसे, गणेश पवार, के. एस. ढाले, श्रावण खरात, अनिल जायभाये, अशोक कोतकर, विजय शिंदे, भारती यांच्या पथकाने केली.

फॉर्मलडी असा होता कोडवर्ड
हेस्पिरिट ज्या बॅरलमधून वाहून नेण्यात येत होते किंवा यासाठी जी कागदपत्रे होती त्यावर फॉर्मल डी असे लिहिले होते. हे द्रव्य केवळ शेतीच्या उपयोगासाठी आहे, असेही लिहिले होते, जेणेकरून गाडी किंवा कागदपत्रे तपासली असता कोणाच्याही लक्षात येऊ नये. हा माल हरियाणातील अंबाला येथून आल्याचे कागदपत्रांवर लिहिले होते. मात्र, स्पिरिटचा ट्रक पुण्याहून आल्याचे कळते. वाळूजहून हा माल धुळे येथे नेला जाणार होता, असे अटकेतील आरोपींनी सांगितले.

स्पिरिट घातकअसल्याचा संशय
मालाडयेथे विषारी दारू सेवनामुळे शेकडो लोक मृत्युमुखी पडले. अशाच प्रकारची बनावट दारू या स्पिरिटपासून तयार केली जाण्याची शक्यता होती. जप्त स्पिरिटमध्ये विषारी घटक आहेत का याची तपासणी सुरू आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बनावट दारू तयार केली जात असावी, असे या कारवाईनंतर दिसून आले.

सूत्रधार कोण ?
औरंगाबादऔद्योगिक क्षेत्रात केवळ तीन मद्यनिर्मितीच्या कंपन्या आहेत. या कंपन्यांना असे स्पिरिट लागते. बनावट दारूचा प्रकार हा श्रीरामपूर, जालना, धुळे या भागात चालत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याच ठिकाणी हा माल जात असावा.

जप्तस्पिरिटमधून बनली असती १४ हजार लिटर दारू
जप्तकेलेले स्पिरिट उच्च दर्जाचे आहे. उसाची मळी किंवा धान्यापासून ते तयार केले जाते. यावर प्रक्रिया केल्यानंतर दारू तयार होते. या मद्यार्कावर शासन मोठ्या प्रमाणात कर आकारते. त्यामुळे त्याची चोरटी वाहतूक होते. या स्पिरिटपासून सुमारे १४ हजार लिटर दारू तयार करता आली असती. शिवाय ४० ते ५० लाखांपर्यंत करही आकारला गेला असता. हाच कर चुकवण्यासाठी त्याची चोरटी वाहतूक केली जाते.
बातम्या आणखी आहेत...