आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"वसतिगृहातून काढल्यास कुलगुरुंच्‍या बंगल्यासमोर बसू - विद्यार्थ्‍यांचा इशारा '

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात २७ नोव्‍हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे राज्यभरातील चार हजारांहून अधिक खेळाडू विद्यापीठात येणार आहेत. त्यांना राहण्यासाठी विद्यापीठाने सध्या राहात असलेल्या दोन हजार विद्यार्थ्यांना वसतिगृह खाली करण्यास सांगितले आहे.
मात्र हे विद्यार्थी जातील कोठे? असा प्रश्न विद्यार्थी संसद सचिव नामदेव कचरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. वसतिगृहाबाहेर काढाल तर कुलगुरूंच्या बंगल्यासमोर बसण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.
मागील वर्षी दुष्काळ होता त्यामुळे विद्यापीठानेच विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची परवानगी दिली होती. यंदाही ही परिस्थिती बदलेली नाही. नोव्हेंबर महिन्यातच गावातील नदी, विहिरीचे पाणी आटले आहे. शेतात माल नाही ही परिस्थिती आहेच. तर काहींच्या परीक्षा सुरू आहेत. तर काहींच्या परीक्षा १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. भाड्याने राहणेदेखील परवडणारे नाही. एकीकडे कार्यक्रमाला प्रेक्षक नाहीत म्हणून ओरड होत असते. एवढा मोठा सोहळा विद्यापीठाच्या परिसरात होतो आहे. मग या पासून विद्यार्थ्यांना वंचित का ठेवले जात आहे, असा प्रश्नही कचरे यांनी विचारला.