आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sport News In Marathi, Ganesh Dusariya Win In Bodybuilding Championship, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गणेश दुसारियाची ‘मराठवाडा श्री’ची हॅट्ट्रिक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - परभणी येथे झालेल्या मराठवाडास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत व्हेरॉक प्रायोजित औरंगाबादच्या गणेश दुसारियाने ‘मराठवाडा श्री’ किताब आपल्या नावे करत स्पर्धेत दबदबा कायम राखला. विशेष म्हणजे त्याने सलग तिस-यांदा ही कामगिरी करत हॅट्ट्रिक साजरी केली. नांदेडचा बुटासिंग उपविजेता ठरला. त्याने बेस्ट पोझरचा किताब जिंकला.
त्याचबरोबर गणेशने वजनी गटात 75 किलोमध्ये सुवर्णपदक पटकावून सर्वांचे लक्ष वेधले. औरंगाबादच्याच विक्रम शिंदेने 65 किलो आणि मुजाहिद्दीनने 70 किलो वजन गटात रौप्यपदक जिंकले. गणेशचे व्हेरॉकचे अध्यक्ष तरंग जैन, उपाध्यक्ष एम. पी. शर्मा, आशियाई शरीरसौष्ठव संघटनेचे सचिव डॉ. संजय मोरे, शिवराज प्रतिष्ठानचे राजेंद्र जंजाळ यांनी अभिनंदन केले.
गणेशला राज्य स्पर्धेत सुवर्ण
गणेश दुसारियाने नुकत्याच सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत 75 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. त्याचबरोबर 21 फेबु्रवारीदरम्यान मुंबई येथे आयोजित फेडरेशन शरीरसौष्ठव स्पर्धेतही तो सहभागी होणार आहे.