आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत "साई' न झाल्यास कोर्टात जाण्याचा क्रीडा संघटनांचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद - भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) विभागीय केंद्र औरंगाबादहून नागपूरला हलवण्याच्या निर्णयाविरुद्ध क्रीडा संघटनांनी सोमवारी साईच्या महासंचालकांना निवेदने दिली. परंतु या निर्णयाबाबत त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. यामुळे संतप्त संघटनांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. जिल्हा हॉकी संघटनेचे उपाध्यक्ष विनोद नरवडे यांनी ही माहिती दिली.
साईचे महासंचालक आय. श्रीनिवास यांच्यासह खासदारांच्या शिष्टमंडळाने साई केंद्राची पाहणी केली. जिल्ह्यातील सुमारे ४० संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली व निवेदन दिले. परंतु साईच्या विभागीय केंद्राबाबत कोणतेही ठोस आश्वासन महासंचालक देऊ शकले नाहीत. त्यामुळे संघटनांनी आंदोलनाची दिशा ठरवली आहे. या वेळी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे हेंमेद्र पटेल, तलवारबाजी संघटनेचे उदय डाेंगरे, अॅथलेटिक्सचे दयानंद कांबळे, खाे-खाेेचे गाेविंद शर्मा उपस्थित होते. फेब्रुवारीत झालेल्या बैठकीत हे केंद्र औरंगाबादेत करण्याचे ठरले होते.
राज्य ताेडण्याचा प्रयत्न : खैरे
अाैरंगाबादच्या वाट्याचे हे केंद्र नागपूरला नेण्याचा निर्णय चुकीचा अाहे. यातून राज्य ताेडण्याचा प्रयत्न हाेत अाहे. त्याचा फटका खेळाडूंना बसेल. हे केंद्र औरंगाबादलाच झाले पाहिजे, असे ‌खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले.
गडकरींची भेट घेणार
भाजपचे प्रवक्ते आणि जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि क्रीडामंत्री सोनोवाल यांना भेटण्याचेही ठरले.
माझ्या अखत्यारीत नाही
^प्रशासकीय अधिकारी म्हणून मी केंद्राची पाहणी केली. विभागीय केंद्राचा दर्जा देण्याचा अधिकार मला पूर्णत: नाही. हा विषयही माझ्या अखत्यारीत नाही. येथील सुविधांबाबत मी अहवाल देणार आहे.
आय. श्रीनिवास, महासंचालक
बातम्या आणखी आहेत...