आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पोर्ट‌्स बाइक आणि पादचारी; अपघातांत बळी, कारण कमी प्रकाश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद: चार स्पोर्ट्‌स बाइक, त्या चालवणारे २० ते २५ वयोगटातले चार तरूण, वेळ संध्याकाळची आणि ठिकाण सेव्हन हिल उड्डाणपुलाचे टोक. वर्षभरात झालेल्या चार वेगवेगळ्या अपघातातील हे साधर्म्य विचार करायला लावणारे आहे. कारण या चार अपघातांनी रस्ता ओलांडणाऱ्या चौघांचा बळी घेतला असून चौघांना गंभीर जखमी केले आहे. 
 
बुधवारी (४ जानेवारी) सायंकाळी सात वाजता सेव्हन हिल उड्डाण पुलाच्या टोकाला एअर इंडिया ऑफिससमोर जालना रोड ओलांडणाऱ्या एका ४५ वर्षीय इसमाला मोटारसायकल स्वाराने जोरदार धडक दिली. त्यात ते तर गंभीर जखमी झालेच, पण दुचाकीस्वारालाही गंभीर स्वरुपाची इजा झाली आहे. हा २५ वर्षीय दुचाकीस्वार स्पोर्ट्‌स बाइक भरधाव वेगाने चालवत होता, हे समोर आले आहे. हेच साधर्म्य गेल्या साडे ११ महिन्यात घडलेल्या चार अपघातात आढळून आले आहे. यातले दोन अपघात पुलाचा पूर्व टोकाला तर दोन पश्चिम टोकाला झाले आहेत. वर्षभरापूर्वीही असे अनेक अपघात झाले आहे हे विशेष. 
 
कमी प्रकाश हेच मुख्य कारण : यापुलाच्या दोन्ही टोकाला झालेल्या अपघातांना वेगाची नशा करणारे दुचाकीस्वार आणि वाहतूक नियम डावलून रस्ता ओलांडणारे पादचारी जसे जबाबदार आहेत तितकाच, किंबहुना अधिक जबाबदार या ठिकाणी असलेला अत्यल्प प्रकाश आहे. पुलावर पथदिवे सुरू असतात; मात्र, पूल संपतो तिथे पूर्व बाजूला दिवेच नाहीत तर पश्चिम बाजुचे बहुतांश दिवे नेहमीच बंद असतात. त्यामुळे वेगाने जाणाऱ्यांना अचानक रस्त्यावर आलेले पादचारी दिसत नसावेत. ज्यावेळी दिसत असावेत त्यावेळी नियंत्रणाची वेळ हातातून निघून गेलेली असावी, अशीच शक्यता अधिक आहे. 

अशी आहे स्थिती 
४ फेब्रु.१६ एअर इंडिया समोर महिला ठार स्पोर्ट्‌स बाइक 
१९ जून १६ एसएफएस समोर महिलेसह ठार स्पोर्ट्‌स बाइक 
२३ नोव्हें. १६ एसएफएस समोर व्यक्ती ठार स्पोर्ट्‌स बाइक 
जाने. १७ एअर इंडिया समोर जखमी स्पोर्ट्‌स बाइक 
 
यावर हवेत ठोस निर्णय आणि कार्यवाही 
-दोन्ही बाजूला असलेला प्रकाश वाढवणे 
-स्पोर्ट्‌स बाइक शहरात चालवण्यावर बंदी आणणे 
-रस्ता सुरक्षितपणे ओलांडण्यासाठी व्यवस्था करणे 
- अतिवेगवान दुचाकी वाहकांवर कारवाई करणे 
बातम्या आणखी आहेत...