आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदाही लाखाची हंडी अन् दिमाखदार ‘गोविंदा’, आयोजक म्हणतात...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. सोमवारी जन्माष्टमी झाल्यानंतर १५ ऑगस्टला दहिदंडी उत्सव साजरा करण्यात येईल. कॅनॉट प्लेस, गुलमंडी आणि टीव्ही सेंटर येथील मोठ्या पथकांबरोबरच शहरातील विविध लहान-मोठ्या मंडळांची दहीहंडी उत्सवाची तयारी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. 
 
यंदाही शहरातील गोविंदा पथक दहिहंडी फोडण्यासाठी सज्ज आहेत. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा करण्यासाठी अनेक लहान-मोठ्या गोविंदा पथकांची तयारी सुरू आहे. ११ हजारांपासून ते १ लाखांपेक्षाहून अधिक रकमांच्या बक्षिसांची खैरात यावर्षी गोविंदा पथकांवर करण्यात येणार आहे. 

‘कॅनॉट’परिसरात धूम 
कॅनॉट प्लेस परिसरातील दहीहंडी विशेष आकर्षण असते. यंदा न्यायालयाच्या नियमानुसार दहीहंडी फोडण्यात येईल. त्यासाठी खास तयारीही सुरू झाली आहे. आर. बी. युवा मंचने यावर्षी मोठा उत्सव साजरा करणार असल्याचे सांगितले. नरेंद्र मोदी विचार मंचनेही यंदा गोविंदा पथकाला विशेष सहकार्य केले आहे. या वेळी गोविंदा पथकाला ५१ हजारांचे बक्षीस आणि सलामी गोविंदा पथकाला मोबाइल देण्यात येणार आहे. मागील वर्षी या मंडळाची दहीहंडी पतित पावन पथकाने फोडली होती. 
 
बाउन्सरची मागणी वाढली 
दहीहंडी पाहण्यासाठी सर्वच मंडळांकडून यावर्षी महिला मुलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना केली जाणार आहे. सगळ्याच मंडळांनी पोलिस प्रशासनाबरोबरच खासगी बाउन्सरलाही प्राधान्य दिले आहे. सेलिब्रिटी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना होणारी गर्दी पाहता कॅनॉट प्लेस, गुलमंडी, टीव्ही सेंटर आदी भागांत बाउन्सरची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. आतापर्यंच सुमारे १०० बाउन्सरची बुकिंग झाली असून, ही संख्या २०० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. 
 
गुलमंडीतही राहणार धूम 
या दोन मोठ्या दहीहंड्यांबरोबरच गुलमंडी, टी. व्ही. सेंटर भागातील उत्सवही विशेष आकर्षण असतो. डीजे, लाइट्स आणि गोविंदा पथकांची दहीहंडी फोडण्याची स्पर्धा येथे विशेष पाहायला मिळते. येथील प्रेक्षकांचा जल्लोष आणि तरुणांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. देवकीनंदन दहीहंडी महोत्सव, क्रिस्टल दहीहंडी उत्सव या दोन मंडळांची तयारी पूर्ण झाली आहे. क्रिस्टल मंडळातर्फे या वेळी गोविदांना ५१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. 
 
‘स्वाभिमान’चे १ लाखाचे बक्षीस 
कॅनॉट प्लेस परिसरातील स्वाभिमान क्रीडा मंडळाची दहीहंडी यंदाही 1 लाख ११ हजार १११ रुपयांची ठेवण्यात आली आहे. माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा गोविंदा पथकाची विशेष सोय करण्यात येणार आहे. या मंडळाच्या यावर्षीच्या दहीहंडीचे वैशिष्ट्य म्हणजे विनोदी कलाकारांसोबतच काही सेलिब्रिटीही दहिहंडीला हजेरी लावणार आहेत. महिला आणि मुलांना दहीहंडी पाहण्यासाठी खास बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. 
 
पुढील स्लाइडवर, आयोजक म्हणतात... आणि बाउन्सरला प्रशिक्षण 
बातम्या आणखी आहेत...