औरंगाबाद - दहावी बोर्डाचे बनावट प्रमाणपत्र तयार करून देणा-या रांजणगाव शेणपुंजीतील तरुणाला गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली. त्याच्याकडून संगणक, प्रिंटर जप्त करण्यात आले.
वाळूजमधील सौरभ राजेंद्र वाघ (22 ) हा मथुरा फोटो स्टुडिओचा मालक आहे. तो दहावी बोर्डाचे बनावट प्रमाणपत्र तयार करून देत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे प्रभारी सहायक पोलिस आयुक्त अविनाश आघाव यांना मिळाली होती. यावरून त्यांनी सातवी पास असणा-या दत्ता रामनाथ लुटे (23) याला व एका पंचाला पाठवले होते. त्याच्याकडून एक हजार रुपये घेऊन सौरभने स्टुडिओतील संगणकात हुबेहूब महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेचे प्रमाणपत्र तयार करून दिले. त्याच वेळी पोलिसांनी छापा टाकून वाघला अटक केली. वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.