आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SSC Examination Aurangabada,latest News Divua Marahti

दहावीच्‍या पहिल्याच पेपरला मनस्ताप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-सोमवारपासून दहावीच्या परीक्षांना सुरुवात झाली. पहिल्या दिवशी मराठी आणि उर्दूचा पेपर झाला; परंतु शहरातील काही परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका कमी पडणे, हॉलतिकिटावर नमूद असणारा क्रमांक केंद्रावर नसणे असे प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागला.
हॉलतिकिटामधील चुका दुरुस्त करण्यासाठी जवळपास 550 विद्यार्थ्यांना परीक्षेच्या एक दिवस अगोदरपर्यंत बोर्डात चकरा माराव्या लागल्या. या विद्यार्थ्यांना इर्मजन्सी हॉलतिकीट देण्यात आले, पण त्यातही जे केंद्र देण्यात आले होते तेथे बैठक क्रमांक आढळून आला नाही. हा प्रकार गोदावरी पब्लिक हायस्कूल, बळीराम पाटील शाळा, पी. डी. जवळकर या केंद्रांवर झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ऐनवेळी केंद्रप्रमुखाने बोर्डाकडे याची माहिती देऊन विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची मुभा दिली. गारखेडा परिसरातील कलावती चव्हाण विद्यालयाच्या केंद्रावर 10 आणि मॉडर्न शिक्षण संस्था संचालित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या दोन्ही केंद्रांवर उर्दू आणि मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिका कमी पडल्या. शिवाय सकाळी 10.30 वाजता प्रश्नपत्रिका पोहोचणे बंधनकारक असताना सकाळी 11.05 वाजता प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती पडल्या. त्यामुळे उशिरा पेपर मिळणार्‍या विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी 20 मिनिटांचा अधिक वेळ देण्यात आला. हडकोतील बहुतेक शाळांमध्ये ही समस्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. परीक्षेदरम्यान केंद्रावर महसूल अथवा बोर्डाचे बैठे पथक नव्हते. बहुतांशी केंद्रांवर भरारी पथकही फिरकले नाही.