आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठीच्या पेपरला एकही ‘कॉपीबहाद्दर’ नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्ह्यातील दहावीच्या कुठल्याही परीक्षा केंद्रावर सोमवारी अनुचित प्रकार घडला नाही. एकही विद्यार्थी कॉपी करताना आढळला नाही. सर्व केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली, अशी माहिती शिक्षण विस्तार अधिकारी संजीवन दिवे यांनी दिली.
इयत्ता दहावीच्या परीक्षेला नगर शहर व जिल्ह्यातील 172 केंद्रांवर 72 हजार 728 विद्यार्थ्यांनी पहिला मराठीचा पेपर दिला. 172 परीक्षा केंद्रांपैकी 157 नवीन अभ्यासक्रमाचे व 15 जुन्या अभ्यासक्रमाचे आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक परीक्षा केंद्र नगर तालुक्यात आहेत. उपद्रवी म्हणून पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानूर येथील भवानीमाता विद्यामंदिर, कर्जतमधील अमरनाथ विद्यालय, शेवगाव येथील आबासाहेब काकडे विद्यालय, जामखेड येथील ल. ना. होशिंग विद्यालय व र्शीनंदादेवी विद्यालय ही पाच परीक्षा केंद्रे घोषित करण्यात आली आहेत. तेथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.