आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ssc Hsc Xam Nanded Pattern Continue In Aurangabad

दहावी, बारावीसाठी ‘नांदेड पॅटर्न’ कायम!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दहावी व बारावी परीक्षांमध्ये कॉपीमुक्त अभियान राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. विभागीय आयुक्त भास्कर मुंडे यांनी याप्रकरणी पुढाकार घेतला असून त्यासाठी पुन्हा ‘नांदेड पॅटर्न’ची मदत घेतली जाणार आहे. राज्यात 1 मार्चपासून इयत्ता 10 वीच्या तर 23 फेब्रुवारीपासून 12 वीची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षांमध्ये कॉपीच्या घटना आढळल्यास संबंधित केंद्र, शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मुंडे यांनी दिला.
सलग तीन वर्षांपासून विभागात - कॉपीमुक्तीकरिता नांदेड पॅटर्न राबविण्यात येत असून याही वर्षी हा पॅटर्न वापरला जाणार आहे. पटपडताळणीमुळे पाचावर धारण बसलेल्या शिक्षण क्षेत्रात या निर्णयाचे स्वागत होते का नाराजी यासंबंधी आता उत्सुकता आहे. कॉपीमुळे शैक्षणिक वातावरण गढूळ झाले होते. मासकॉपीच्या घटना वाढल्यानंतर 2009 मध्ये नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकर परदेशी यांनी विशेषाधिकार वापरून कॉपीमुक्त अभियान यशस्वी करून दाखविले. त्यानंतर हा पॅटर्न राज्यभर राबविण्यात आला.
कडक धोरण : यावर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळद्वारे घेण्यात येणा-या 10 व 12 वीच्या परीक्षा भयमुक्त आणि कॉपीमुक्त होण्यासाठी विभागीय आयुक्तांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात लवकरच जिल्हाधिकारी आणि शिक्षण विभागाला आदेश देण्यात येणार आहेत. मासकॉपीचा प्रकार आढळून आल्यास केंद्रांवर, संबंधित शिक्षकांवर आणि विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त मुंडे यांनी दिली. कॉपीप्रकाराला आळा घालण्यासाठी महसूल विभागाची पथके तयार करण्यात येणार असून याप्रकरणी हयगय केल्यास त्यांच्यावरही कारवाई टक्केवारी घसरण्याची शक्यता: मागच्या वर्षी औरंगाबाद विभागाचा निकाल 54.99 टक्के इतका लागला होता. 2010 मध्ये औरंगाबाद विभागाचा निकाल 71.68 टक्के इतका लागला होता. कॉपीमुक्त अभियान जोरदारपणे राबविण्यात आल्याने निकालावर त्याचा परिणाम होत आहे. प्रशासनाने यावर्षी कॉपीमुक्तीचा दट्ट्या उगारल्याने टक्केवारी घसरण्याची शक्यता शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
अभियान गरजेचे- विभागीय आयुक्तांनी घेतलेला निर्णय खूप चांगला आहे. गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कॉपीमुक्त अभियान गरजेचे आहे. यामुळे निकालाची टक्केवारी घसरली तरी विद्यार्थ्यांना पुढे अभ्यासाची सवय लागून दोन-तीन वर्षानंतर निकालामध्ये वाढ होईल. - डॉ.अशोक तेजनकर, उपप्राचार्य, देवगिरी महाविद्यालय