आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओव्हरटेकच्या प्रयत्नात बस दोन वाहनांना धडकली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजिंठा- अजिंठाघाट उतरणाऱ्या भरधाव एसटीने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या दोन वाहनांना धडक दिली, तर बसच्या पाठीमागून येणारी कार बसवर धडकली. चार वाहनांच्या या विचित्र अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले असून दोन छोटा हत्तीमध्ये असलेल्या दोन म्हशी दगावल्या. अपघातामुळे घाटात सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. हा अपघात गुरुवारी दुपारी चार वाजता घडला.
या अपघातात शिवाजी आत्माराम मुके, तात्याराव लक्ष्मण पाचिंगे, मानसा माणिकराव पाचिंगे (रा. अनाड, ता. सिल्लोड), मोतीराम नामदेव ढाकरे (रा. अजिंठा), नीलाबाई निवडे (रा. वसई) हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत, तर कार एसटीमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या वेळी अपघातग्रस्त एसटीत ५३ प्रवासी होते.

गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास वैजापूर- जळगाव बस (एमएच २० बीएल २३९२) ही भरधाव अजिंठा घाट उतरत होती. दरम्यान, ओव्हरटेक करताना खालून छोटा हत्ती लोडिंग (एमएच २० सीटी १९९३) ला समोरून धडक मारली. तसेच दुचाकी (एम.एच.२० सीएन ३०७७) बसच्या चाकाखाली चिरडली. यात छोटा हत्ती पलटी झाला. यातील दोन म्हेशी जागेवरच दबून मेल्या. छाेटा हत्ती वाहनातील शिवाजी मुके, तात्याराव पाचिंगे, मानसा पाचिंगे, मोतीलाल ढाकरे हे चारही जण गंभीर जखमी झाले. तसेच दुचाकीवरील पांडुरंग निवडे यांनी चालत्या दुचाकीवरून उडी मारल्याने तो बचावला, तर त्यांची आई नीलाबाई निवडे यांचा एक पाय तुटला. त्याही गंभीर जखमी झाल्या. अपघात होताच एसचटी चालकाने धूम ठोकली. दरम्यान, बसच्या पाठीमागून येणारी कार (एमएच १९ बीएल २३९२) एसटीला धडकली. या वेळी घाटात जवळपास अर्धा तास वाहतूक खोळंबली होती. या वेळी पोलिस कर्मचारी अजय मोंतिगे, अमोल रोकडे, बिबरकर यांनी वाहतूक सुरळीत केली. जखमीवर अजिंठा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक सर्जेराव घोरपडे, डाॅ. शेख, राम बन्सल, दीपक जाधव, पारखे मॅडम यांनी उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबादकडे पाठविले, तर अजिंठ्याचे एसटी वाहतूक नियंत्रक एस. भोटकर यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी अजिंठा पोलिस ठाण्यात जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. अपघातातील पाच जण गंभीर जखमी झाले होते. रुग्णवाहिका रुग्ण घेण्यासाठी आली. मात्र, चालकाने आम्हाला दोनच रुग्ण नेता येतील. पाच नेता येणार नाहीत असे सांगत काढता पाय घेतला.
बातम्या आणखी आहेत...