आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरोध, चिकटटेप लावूनही डीझेल गळती काही थांबेना; अखेर ट्यूब पट्ट्या बंधल्या अन् बस धावली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गळती थांबवण्याचे प्रयत्न करताना चालक... - Divya Marathi
गळती थांबवण्याचे प्रयत्न करताना चालक...
बीड / औरंगाबाद - अंबाजोगाई बसस्थानक येथून शनिवारी ३.३० वा. बस औरंगाबादकडे निघाली. नंदुरफाटा येथे महामंडळाच्या बसमधील प्रवासी उतरत असताना काहींनी चालकाला डीझेल गळती होत असल्याचे सांगितले. चालकांनी प्रसंगावधान लक्षात घेत बस सुरू करून हायवेच्या बाजुस घेतली. इंजिनवरील कव्हर काढून तपासण्यास प्रारंभ केला. तेव्हा डिझेलपाईप लिकेज असल्याचे निर्दशनास आले. लिकेज बंद करण्यासाठी चालकांनी तब्बल पाऊन तास वेग-वेगळ्या शक्कल लढवल्या. त्यामुळे, प्रवाश्यांची तारांबळ उडाली होती. 
 
 
चालकांनी फाटा परिसरात गॅरेज पाहिले. परंतू मेडीकल दिसून आले. त्यांनी चक्क निरोध आणि चिकट टेपचा वापर करून पाऊन तास डीझेल गळती थांबवण्याचे प्रयत्न केले. दरम्यान वाहक यांनी काही अंतरावर जाऊन सायकल मार्ट येथून ट्यूबच्या पट्या आणल्या. त्यानंतर चालक व वाहक दोघांनी मेकॅनिकच्या भूमिकेत जाऊन डीझेल गळतीच्या पाईप दुरूस्त केला. तब्बल पाऊन तास शर्यतीचे प्रयत्न करून बसची डिझेल गळती बंद करून बस पुन्हा सुरू झाली.
बातम्या आणखी आहेत...