आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मान्सून लांबल्याने ‘बस’ला फटका; एसटी महामंडळाच्या आळंदी फेर्‍यांना अल्प प्रतिसाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - देहू, आळंदी येथून निघणर्‍या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत वारीत सहभागी होणार्‍या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून दरवर्षी आळंदीसाठी जास्तीच्या बसगाड्या सोडल्या जातात. मागील वर्षी या माध्यमातून महामंडळाला 7 लाखांचे उत्पन्न मिळाले होते. परंतु या वर्षी पावसाअभावी पेरण्या खोळंबल्याने वारीला जाणार्‍यांची संख्या घटली आहे. एसटीच्या व्यवसायावर याचा परिणाम जाणवत आहे. गुरुवारी संत तुकाराम महाराजांच्या पालखीने पंढरीच्या दिशेने प्रस्थान केले. विविध आगारांतून आतापर्यंत केवळ 12 ते 15 गाड्या गेल्या आहेत.

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या, दिंडीसोबत वारीत सहभागी होण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून हजारो भाविक आळंदीला जातात. त्यामुळे वारकर्‍यांच्या सोयीसाठी परिवहन महामंडळाकडून मोठ्या प्रमाणावर बसगाड्या सोडल्या जातात. यातून चांगले उत्पन्नही मिळते. परंतु या वर्षी मान्सून लांबल्यामुळे आषाढी एकादशीनिमित्त वारीला जाणाºया भाविकांची संख्या कमालीची घटली आहे. पेरण्याही खोळंबल्याने जिल्ह्यातील शेतकºयांना वारीवर पाणी सोडावे लागत आहे. याचा परिणाम एसटीच्या व्यवसायावरही होत आहे.

मागील वर्षी आळंदीसाठी शहरातील मध्यवर्ती व सिडको बसस्थानक, पैठण, सिल्लोड, गंगापूर, वैजापूर, कन्नड, सोयगाव आगारातून 65 बस गाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे या वर्षी मंडळाने आळंदीसाठी 90 गाड्यांचे नियोजन केले होते. त्यानुसार सर्व आगारांना टार्गेटही देण्यात आले होते. गुरुवारी पंढरपूरच्या दिशेने संत तुकाराम महाराजांची पालखी निघाली. परंतु 18 जूनपासून सोडण्यात येणार्‍या जास्तीच्या बसगाड्यांना अल्प प्रतिसाद असल्या ने आतापर्यंत विविध विभागांतून अवघ्या 15 बसगाड्या गेल्याची माहिती विभागीय कार्यालयाकडून मिळाली. प्रवाशांचा प्रतिसाद पाहता 21 जूनपर्यंत केवळ 45 बसगाड्या जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मागील वर्षीपेक्षा 15 ते 20 बसगाड्या कमी होण्याची शक्यता आहे. परंतु आगामी दोन दिवसांमध्ये भाविकांचा प्रतिसाद वाढण्याची आशा मंडळाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. एसटीला होत असलेला तोटा भरून काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.

आज जादा बसगाड्या सोडणार
योगिनी एकादशीनिमित्त 23 जून रोजी त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तिनाथ महाराजांच्या जयंतीनिमित्त भरणाºया यात्रेसाठी औरंगाबादसह पैठण, वैजापूर व सोयगाव आगारातून 15 बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. तर पैठणसाठी औरंगाबाद मध्यवर्ती व सिडको बसस्थानक, पाचोड, शेवगाव, शहागड आगारातून 12 बसगाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती विभागीय कार्यालयातील अधिकाºयांनी दिली.