आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीची आजपासून भाडेवाढ;औरंगाबादसाठी आता लागतील 207 रुपये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- डिझेलसोबत स्पेअर पार्टस्च्या किमती वाढल्याने एसटीने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून (मंगळवार) या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. बसभाड्यात 6.48 टक्के भाडेवाढ होणार असल्याने प्रवाशांना खिसा रिकामा करावा लागणार आहे. भाडेवाढीमुळे भुसावळहून जळगावला जाण्यासाठी 27 रु पयांऐवजी आता 29 रुपये मोजावे लागतील.

सर्वत्र महागाईची चर्चा सुरू असतानाच एसटीने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेऊन प्रवाशांना धक्का दिला आहे. परिवहन महामंडळाने नुकतीच कर्मचार्‍यांची 13 टक्के वेतनवाढ जाहीर केली आहे. तसेच डिझेलच्या दरातही दरमहा वाढ होत आहे. यामुळे निर्माण झालेली आर्थिक तूट भरून काढण्यासाठी परिवहन महामंडळाने भाडेवाढीचा निर्णय घेतला. ग्रामीण भागातील प्रवासी वर्ग, शिक्षणासाठी अप-डाऊन करणारे विद्यार्थी यांच्यासह सर्वसामान्यांनाच भाडेवाढीची सर्वाधिक झळ बसणार आहे.

शिक्षणासाठी ग्रामीण भागातून शहराकडे अपडाऊन करणार्‍या अनेक विद्यार्थ्यांनी महिन्याच्या सुरुवातीलाच अर्थात पहिल्या तारखेलाच बसपास काढून घेतला. मात्र, 1 तारखेला पास न काढणार्‍या विद्यार्थ्यांना आता भाडेवाढीचा फटका सहन करावा लागेल. महामंडळाने प्रवाशांसाठी जाहीर केलेल्या विविध योजनांनाही 2 जुलैनंतर भाडेवाढ लागू केली जाणार आहे.

भुसावळहून भाडेवाढ अशी
पंढरपूर 448 (जुने)- 477 (नवीन)
नाशिक 259(जुने) -276(नवीन)
पुणे 367(जुने)-391(नवीन)
शिर्डी 243(जुने)- 259(नवीन)
चोपडा 65(जुने) -69(नवीन)
अकोला 151(जुने)- 161(नवीन)
वरणगाव 19(जुने)-20(नवीन)
औरंगाबाद(जामनेर) 157- (जुने) 187(नवीन)
औरंगाबाद (जळगाव) 178(जुने)- 207(नवीन)
विठ्ठलवाडी 400(जुने)-426(नवीन)
सुरत 306(जुने) -321(नवीन)
उधना 318(जुने) -327(नवीन)