आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: एसटीने सिग्नलवर उभी 5 वाहने चिरडली, खांबाला धडकल्याने इतर वाहने बचावली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सिडको बसस्टँड चौकात एसटीने सिग्नलवर उभ्या तीन रिक्षा, एक कार आणि एका दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू तर जण जखमी झाले. बालाजी गणपती ढवारे (४२, सनी सेंटर) संजय म्हसजी जाधव (४०, बेगमपुरा) अशी मृतांची नावे आहेत. 
 
बसचालक म्हणाला, ब्रेक लागला नाही : बसचालक सज्जन इंदल नायमाने म्हणाला, ‘मी स्टँडमधून गाडी बाहेर काढली तेव्हा ती पहिल्याच गिअरमध्ये होती. मी ब्रेक लावण्याचा प्रयत्न करूनही तो लागत नव्हता. बस थेट समोर असलेल्या रिक्षांना धडकली. धडकेनंतर एक रिक्षा उलटून बसच्या खाली चिरडली, तर दुचाकीवरील बालाजी ढवारे आणि संजय जाधव बसच्या खाली आले. बालाजी यांचा जागीच तर संजय यांचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. 
 
काय घडले : दुपारी ४.३० वाजता औरंगाबाद-बीड बस (एमएच ४० एन ९७६८) सिडको स्टँडवरून निघाली आणि थेट सिडको चौकातील सिग्नलवर उभ्या तीन रिक्षा, एक कार आणि दुचाकीला धडकत सिग्नलच्या खांबाला जाऊन अडली. यामुळे इतर वाहने धडकेपासून बचावली. 
 
एसटीचालक ताब्यात : एसटीचा चालक सज्जन इंदल नायमाने (२६, रा. कादराबाद) याला पोलिसांनी सिडको बसस्थानकावरून ताब्यात घेतले. 
 
जखमींची नावे : संजय दशरथ शिरसाठ (५०, रा. जयभवानीनगर), रेवणनाथ भागीनाथ नरोडे (३२, रा. चिकलठाणा), सांची सत्यपाल वाघ (०४), पारनीता सत्यपाल वाघ (०९), प्रतिभा सत्यपाल वाघ (२८) ( सर्व राहणार- सारा वैभव जटवाडा रोड), छायाबाई रामचंद्र घाटे (६०, रा. कन्नड), नगमा हुम्मे हाजी (२०, रा. टाऊन हॉल) अशी जखमींची नावे आहेत. मृत ढवारे हे सुतारकाम करत होते, तर जाधव हे ठेकेदार होते. 
 

पुढील स्‍लाइडवर...दोन जणांचे प्राण घेणारा तो बसचालक म्हणाला, माझ्याकडून ब्रेक लागला नाही
बातम्या आणखी आहेत...