आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीची भाडेवाढ २ रुपयांवर निभावली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एसटी महामंडळावर इंधनाचा अतिरिक्त भार पडत असून तो कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने शुक्रवारपासून प्रवासभाड्यात २ ते ४ रुपयांची वाढ केली. गुरुवारी मध्यरात्री १२ वाजेपासून ही वाढ लागू झाली आहे. ६० किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी एका पैशाचीही वाढ केलेली नाही. मागील सहा महिन्यांपासून डिझेलचे दर दरमहा ५० पैशाने वाढत असताना दोन रुपयांवर दरवाढ निभावली आहे.
एसटी महामंडळाने शंभर रुपयांमागे ८० पैशाची भाडेवाढ केली आहे. औरंगाबादहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना लक्झरी बसने प्रवास करण्यासाठी ३३३ रुपयांऐवजी ३३५ रुपये मोजावे लागणार आहेत. रातराणीसाठी २८९ ऐवजी २९१ तर साधारण बसने जाण्यासाठी २४४ ऐवजी २४६ रुपये मोजावे लागणार आहेत. यात दोन ते तीन रुपयाने दर वाढले आहेत. औरंगाबादहून नागपूरला लक्झरी बसने जाण्यासाठी पूर्वी ७२७ रुपये भाडे लागत होते. आता मात्र ७३१ रुपये मोजावे लागणार आहेत. दोनशे किमींपेक्षा जास्त असलेल्या प्रवासाला दोन रुपये, तर त्यापेक्षा जास्त प्रवासाला तीन ते चार रुपये जास्त मोजावे लागतील.