आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी महामंडळाकडे वर्ग करा सिडकोचे बसस्थानक, कृती समितीची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- वाळूज महानगरातील सिडकोच्या नगर क्रमांक एक परिसरात २० वर्षांपूर्वी बसस्थानक उभारण्यात आले. मात्र, सध्या येथे बस फिरकत नसल्याने या बसस्थानकावर केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया जात आहे. त्यामुळे हे बसस्थानक एसटी महामंडळाने स्वत:कडे घेऊन तेथून शहर बसेसचे नियोजन करण्याची मागणी पुढे येत आहे. याबाबत वाळूज महानगर नागरी कृती समितीने पुढाकार घेतला असून एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागीय नियंत्रक कार्यालयास निवेदनही दिले आहे.

औरंगाबाद शहरापासून आठ किलोमीटरवर वाळूज महानगर हे नवीन शहर बसवण्याचे काम सिडको प्रशासनाने २५ वर्षांपूर्वी हाती घेतले. वाळूज परिसरातील १८ गावे त्यात अधिसूचित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली. वाळूज एमआयडीसीतील विविध कारखान्यांतील कामगारांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने महाराष्ट्र शासनाने सप्टेंबर १९९३ रोजी प्रारूप विकास आराखडा तयार केला. त्यानंतर हे काम सिडकोकडे देण्यात आले. सिडकोने वाळूज महानगरात चार नगरे बसवण्याचा निर्णय घेऊन विकास कार्यक्रमास प्रारंभ केला.

त्यातून नगर क्रमांक एकमध्ये परिसरातील रहिवाशांसाठी शहर बस वाहतुकीसाठी बसस्थानक बांधण्यात आले. या बसस्थानकात तीन निवारेही उभारण्यात आले. त्यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. दळणवळणाच्या सोयी वाढल्यामुळे हळूहळू वाळूजमध्ये वसाहती विस्तारल्या. विविध कारखान्यांचे उद्योजक,कामगार,नोकरदार,व्यापारी आदी घरांची खरेदी करून परिसरात २० वास्तव्यास आले. परंतु बसस्थानकाचा वापरच होत नसल्याने त्यावरील खर्च वाया गेला.
०४ वर्षांपूर्वीझाले स्थानकाचे बांधकाम
२५ नगरेवसवण्याचा सिडकोचा निर्णय
१८ वर्षांपूर्वीवसले वाळूज महानगर

गावेवाळूज परिसरात
बसस्थानकाचे काम खूप चांगले झाले आहे. मात्र, वापराविना हा खर्च वाया जात आहे. आता तर या थांब्यांना काटेरी झुडुपांनी वेढले अाहे. स्थानकातून बससेवा सुरू झाली तर सर्वांनाच फायदा होईल. कल्याणमावस, रहिवासी

रहिवाशांच्या सोईसाठी सिडकोने बसस्थानक बांधले. त्यावर लाखो रुपयांचा खर्च केला आहे. आता या ठिकाणी बस सुरू करावी. मात्र, ती वेळापत्रकाप्रमाणे यावी. स्थानकात वेळापत्रक लावण्यात यावे. कृष्णाशिंदे, ज्येष्ठनागरिक

सिडको वसाहतीपासून नगर-औरंगाबाद महामार्ग किलोमीटरवर आहे. पायपीट करून हे अंतर कापावे लागते. बस सिडकोतील स्थानकात आल्यास ही पायपीट थांबेल. अस्मिता कुलकर्णी,
सूर्यवंशीनगर,सिडको, वाळूज
सिडकोने बसस्थानकाचे बांधकाम उत्तमरीत्या केले आहे. नियंत्रण कक्षही आहे. त्याचे एसटीकडे हस्तांतरण झाल्यास शहर बससेवेचे वेळापत्रक सांभाळणे शक्य होईल. पी.एस.गुजर,निमंत्रक,वाळूजमहानगर नागरी कृती समिती

रहिवाशांची निराशा
मागणीनंतर एसटीने या भागातून शहर बस सुरू केली. त्यामुळे वर्षभरापूर्वी सिडको प्रशासनाने बसस्थानकाची स्वच्छता, रंगकामही केले होते. स्थानकातून बससेवा सुरू होणार असल्याने रहिवाशांत उत्साहाचे वातावरण होते, परंतु शहरबस स्थानकात येता रस्त्यावरूनच निघून जात असल्याने रहिवाशांची निराशा झाली.
बसअभावी पायपीट
सिडको प्रशासनाने बसस्थानक बांधून पाच थांबे उभारले, परंतु लाखोंचा खर्च करूनही राज्य परिवहन महामंडळाची बस फिरकली नाही. सध्या सुरू असलेली शहर बससेवा बाहेरून चालवली जाते. स्थानकात बस येत नसल्यामुळे रहिवाशांना दीड किलोमीटर पायी जावे लागते. त्यात त्यांचा वेळ, पैसा खर्च होत आहे.

स्थानकाकडे दुर्लक्ष झाल्याने सर्वत्र काटेरी झाडे उगवली आहेत. सर्वत्र गवत पसरले असून बसस्थानकातील कंट्राेल रूमला स्टोअर रूमचे स्वरूप आले आहे. तुटलेले फर्निचर तिथेच पडून आहे. एकूणच बसस्थानक परिसराला जंगलाचे स्वरूप आले आहे.