आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी कर्मचा-यांना वाढीव भत्त्याची रक्कम जुलै महिन्यात मिळणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एसटी कर्मचा-यांना वाढीव सात टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय गतवर्षी घेण्यात आला होता. मात्र, जुलै २०१४ ते जानेवारी २०१५ या सात महिन्यांची रक्कम अदा करण्यात आली नव्हती. यासाठी कामगार संघटनेच्या वतीने मंडळाकडे वेळोवेळी मागणी केली होती. याबाबत शुक्रवारी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक घेण्यात आली. या वेळी हा निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...