औरंगाबाद - परिवहन महामंडळ अर्थात एसटीकडून प्रवाशांच्या आणि सरकारकडून एसटीच्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न सोमवारी दै. "दिव्य मराठी'च्या टॉक शो उपक्रमात झाला. वारंवार प्रवासी भाडेवाढीऐवजी एसटीने बससंख्या, फेऱ्या वाढवून उत्पन्न वाढवावे, शासनाने एसटीसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी. महिलासांठी खास बससेवा, सुरक्षेची काळजी, विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विभाग अशा काही मागण्या या चर्चेतून समोर आल्या.
{एसटीचा तोटा कमी होण्यासाठी प्रवासी कर कपात, टोलमुक्ती.
{आगार, गाड्या स्वच्छतेचे कडक िनयम करा. प्रवाशांचेही कर्तव्य.
{तीर्थक्षेत्रांचा िवचार करून गाड्यांच्या वेळा ठरवाव्यात.
{शहरांतून रेल्वेने येणाऱ्यांच्या वेळेला गावी जाणारी एसटी हवी.
{एसी गाड्यांची संख्या वाढवावी. रेल्वेप्रमाणे अॅडव्हान्स बुकिंग.
{वारंवार प्रवासी भाडेवाढीऐवजी एसटीचे आधुनिकीकरण हवे.
{भाडेवाढ किचकट स्वरूपात न करता ५ रुपयांच्या पटीत करा.
{महामंडळावरील १७ टक्के प्रवासी कर ६ टक्के करावा.
{सार्वजनिक वाहतूक व्यवस्था डिझेल खरेदीवर सवलत द्यावी.
{कामगारांचे प्रश्न सोडवून त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध द्याव्या.
{कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोग स्थापन करण्यात यावा.
{विविध सवलतींचे १३०० कोटी महामंडळाकडे वर्ग करावेत.
{महिलांसाठी स्वतंत्र बससेवा, विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कक्ष करा.
{चालक- वाहकांनी प्रवाशांना सौजन्याची वागणूक द्यावी.
{महिला, अपंगांसाठीची
राखीव आसने रिकामी करून द्यावीत.
{चोरी, छेडछाड रोखण्यासाठी आगार, एसटीत कॅमेरे बसवा.
{बसमध्ये ४० पैकी २१ जागा आरक्षित, यात बदल करा.
{आमदार व खासदारांसाठी राखीव जागा रद्द कराव्यात.
{गुजरातप्रमाणे राज्य सरकारने २००० काेटींची मदत द्यावी.
{बसस्थानकांचे आधुनिकीकरण व सुशोभीकरण करण्यात यावे.
{ विद्यार्थ्यांसाठी मिनीबस सुरू करा. अवैध वाहतूक बंद करा.
{तिकीटदर पाच रुपयांच्या पटीत ठेवा. सुट्या पैशांचे झंझट नको.
एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी कामगार संघटनांचे प्रतिनिधी, प्रवासी संघटनेचे सदस्य, विद्यार्थी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, महिला आदींचा सहभाग.