आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऐन दिवाळीत एसटीची भाडेवाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दिवाळीच्या सुटीतील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन ज्यादा बसेस वाढवण्याऐवजी परिवहन महामंडळाने १० ते २० टक्क्यांनी प्रवास भाडे वाढवले आहे. यामध्ये खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनीही ३० टक्के वाढ केली आहे.
पन्नास टक्के प्रवाशांनी एक ते दीड महिन्यापूर्वी बुकिंग केली आहे. ऐन वेळी जाणाऱ्या ५० टक्के प्रवाशांना वाढीव भुर्दंड बसणार आहे. महामंडळाने तोटा भरून काढण्यासाठी साधी बस १० टक्के, एशियाड १५ टक्के आणि शिवनेरी, एसी बस २० टक्के या प्रमाणात भाडेवाढ केली आहे. म्हणजेच १०० रुपयांमागे प्रवाशांना १० ते २० रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. २२, २३, २४, २८ ऑक्टोबर ते नोव्हेंबर, आणि १२ ते १४ नोव्हेंबरदरम्यान भाडेवाढ असेल, अशी माहिती विभाग नियंत्रक आर. एन. पाटील यांनी दिली.
निर्णय योग्य नाही
ऐनदिवाळीत एसटी महामंडळाने घतलेला निर्णय योग्य नाही. मंडळाला तोटा का येतो याचे कारण शोधून व्यवस्थापनाने कार्यवाही करण्याऐवजी भाडेवाढ करणे संयुक्तिक नाही. ही तर प्रवाशांची लूट आहे, अशी नाराजी महिला प्रवासी पल्लवी चव्हाण यांनी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...