आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांची अशीही जीवघेणी बैठक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर - अद्ययावत रीतीने बांधण्यात आलेल्या सिन्नर बसस्थानकात ग्रामीण भागातील प्रवासी बस लागते त्या पाय-यांवर बसत असल्याने त्यांची ही धाडसी व जीवघेणी बैठक एसटी कर्मचा-यांच्या चिंतेचा विषय ठरते आहे.
बसस्थानकात विस्तीर्ण आकाराचे दहा प्लॅटफार्म असून, बस येऊन थांबते त्या ठिकाणी दोन पाय-या बनवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर स्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी चांगल्या दर्जाची बाके बनवण्यात आली आहेत. मात्र, बहुतांश प्रवासी बाकांवर न बसता पाय-यांवर बसण्यास पसंती देतात. बस आली की लगेचच जागा मिळवता यावी, यासाठी उद्देश असल्याचे आढळून येते. मात्र, त्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जुन्या बसस्थानकात प्लॅटफार्मवर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या अंगावर बस धडकून अपघात झाल्याची घटना घडल्या आहेत. असे असतानाही या धोक्याकडे दुर्लक्ष करून प्रवासी या पाय-यांवर बसची वाट पाहत ओळीने बसले असल्याचे दृश्य नेहमीच दिसते.
बैठक व्यवस्थेकडे प्रवाशांची पाठ - सिन्नर बसस्थानकात स्टेनलेस स्टीलचे बाके बसवण्यात आली आहे. मात्र, अनेकदा बाके रिकामी असूनही प्रवासी पाय-यांवर बसत असल्याने धोका पत्करणा-या प्रवाशांविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात येते.
सूचनांकडे प्रवाशांचे सातत्याने दुर्लक्ष - पाय-यांवर बसू नये अशा सूचना प्रवाशांना देण्यात येतात. स्थानकाचे वाहतूक निरीक्षक, वाहक, चालक व अधिका-यांकडून प्रवाशांना सतत ध्वनिक्षेपकावरून प्रवाशांना सूचित करण्यात येते. तथापि, प्रवाशांकडून त्यांचे तात्पुरत्या स्वरूपात पालन होते. सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने अधिकारी त्रस्त झाले आहेत. - पी. के. कुलकर्र्णी, सहायक वाहतूक अधीक्षक, सिन्नर आगार
पाय-यांवर बसणे चुकीचेच - ग्रामीण भागातील प्रवासी मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यांना इतकी समज राहत नाही. पाय-यांवर बसणे चुकीचेच आहे. मात्र, प्रत्येकानेच धोका लक्षात घेऊन पाय-यांवर बसणे टाळले पाहिजे. - नवनाथ वारुंगसे, प्रवासी, डुबेरे