आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...अन् बॉलीवूडला भावले शेट्टीज ग्रुपच्या स्टंटचे थ्रिल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बाइकवर स्टंट करण्याचा प्रयत्न अनेक तरुण करतात; पण प्रत्येक जण त्यात स्वत:ला सिद्ध करू शकत नाही. औरंगाबादचा आदित्य घुसळे हा मात्र याला अपवाद ठरला आहे. त्याचे बाइक स्टंट आणि व्हिल्लीचे वेगवेगळे प्रकार हे शहरातील लोकांबरोबरच बॉलीवूडलादेखील भावले आहेत. लवकरच तो आदित्य एन.चंद्रा दिग्दर्शित "तेजाब-२' या सिनेमात स्टंट करताना दिसणार आहे.
आदित्य हा स्टंट ट्रेनर असून तो युवकांना शेट्टीज ग्रुप या नावाखाली स्टंट शिकवत असतो. लोक सात वर्षांपासून या स्टंट ग्रुपचा थरार अनुभवत आहेत. हेच स्टंट आता मोठ्या पडद्यावरदेखील बघायला मिळणार आहेत. बेसिक व्हिल्ली, हाफओल्ड व्हिल्ली, स्टॉपी, रोलिंग स्टॉपी, नो हँडेड व्हिल्ली, सर्कल व्हिल्ली, नॅक-नॅक व्हिल्ली, हायचेअर सर्कल व्हिल्ली, फ्री स्टायलिंग स्टंटिंग हे बाइक स्टंट्सचे प्रकार हा शेट्टीज ग्रुप सादर करत असताे.

किट गरजेची : स्टंट करण्यासाठी खूप मेहनत गरजेची असल्याचे आदित्यने "दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले. यासाठी अनेक महिन्यांची ट्रेनिंग गरजेची असते. वारंवार सराव केल्यानंतर त्याचे सादरीकरण करत असतो, असेही त्याने सांगितले. या वेळी सरावादरम्यान व प्रत्यक्ष स्टंट करताना सेफ्टी म्हणून किट गरजेची असते, यामध्ये ग्लोव्हज, शूज, हेल्मेट, नी पॅड आणि प्रथमोपचार पेटीचा समावेश असतो.

'धूम'मुळे प्रेरणा..
२००४ मध्ये प्रदर्शित झालेला "धूम' हा चित्रपट आम्हाला प्रेरणादायी ठरल्याचे आदित्यने सांगितले. ग्रुपमधला प्रत्येक मुलगा शहरातील विविध महाविद्यालयांत शिक्षण घेत आहे. पॅशन म्हणून हे युवक ही कला लोकांना दाखवतात. नांदेड, गंगापूर, खुलताबाद, परळी, दौलताबाद व शहरात अनेक ठिकाणी या स्टंट ग्रुपने स्टंटबाजी करून वाहवा मिळवली आहे.

मानसिकता बदलण्याची गरज
स्टंट करणाऱ्यांना रिकामटेकडे म्हटले जाते. याउलट मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये त्यांचा गौरव होतो. स्टंट रायडर्सना पोलिसांकडून गुन्हेगारासारखी वागणूक दिली जाते. चेन स्नॅचिंगसारख्या गुन्ह्यांत त्यांची चौकशी केली जाते. लोकांनी मानसिकता बदलण्याची गरज स्टंट रायडर्सनी व्यक्त केली.

पोलिसांना करणार मदत
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे कार्य आम्हाला खूप आवडले आहे. त्यांनी सुरू केलेल्या चार्लींमुळे शहरातील गुन्हेगारी कमी झाली आहे. आम्हीही पोलिस आयुक्तांची भेट घेणार असून त्यांना गरज असल्यास मदतही करू, असे आदित्य आणि त्याच्या स्टंट रायडर्सनी सांगितले. अनाथ मुलांच्या मदतीसाठी शो करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे शेट्टीज ग्रुपने सांगितले.

मॉडिफाइड गाड्यांचा वापर : स्टंटसाठी स्टंटमॅनच्या गरजेनुसार गाड्या मॉडिफाइड केलेल्या असतात. त्यांना क्लचच्या खाली एक हँडब्रेक असतो, व्हिल्ली नीट होण्यासाठी व्हिल्ली बार, सेफ्टी गार्ड, पेट्रोलच्या टाकीला डेंट करून बसण्यासाठी जागा असते. यामुळे कमी धोका होतो.
बातम्या आणखी आहेत...