आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातून थेट हैदराबाद विमानसेवेला प्रारंभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबादकडे जाणाऱ्या विमानात बसण्यासाठी निघालेले प्रवासी. - Divya Marathi
हैदराबादकडे जाणाऱ्या विमानात बसण्यासाठी निघालेले प्रवासी.
औरंगाबाद- जेट एअरलाइन्सच्या औरंगाबाद-हैदराबाद-तिरुपती दैनंदिन विमानसेवेला रविवारी सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी ५५ प्रवाशांनी हैदराबादकडे प्रयाण केले. श्री तिरुपती बालाजी ते शिर्डी साईबाबा अशी सेवाही मागणीनुसार कंपनी उपलब्ध करून देणार आहे. यामुळे दक्षिण मध्य भारत प्रथमच विमानसेवेने जोडला गेल्याने भाविक, पर्यटक, उद्योजक, व्यावसायिकांना सुलभ झाले आहे. याचबरोबर पर्यटन उद्योगाला चालनाही मिळण्याची आशा आहे.
रविवारी ट्रुजेटचे विमान हैदराबादवरून ११.३० वाजता निघून ते १२.५० ला औरंगाबाद विमानतळावर पोहोचले. दररोज याच वेळेत हे विमान लँडिंग करेल. त्यानंतर सव्वा वाजता (१.१५ वा.)
प्रवाशांना सुरक्षित दर्जेदार ट्रान्सपोर्ट सेवा हवी आहे. त्या दृष्टीने विकास झालाच पाहिजे. ट्रुजेट विमानसेवा सुरू झाल्याने शेकडो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. आमदारइम्तियाज जलील, प्रवासी

ट्रुजेट विमानसेवेने दोन धार्मिक पर्यटन स्थळे जोडली गेल्याचा मनस्वी आनंद झाला आहे. एमटीडीसी राविप्राच्या संयुक्त विद्यमाने विदेश सेवाही लवकरात लवकर कशी सुरू करता येईल, यावर भर दिला जाईल. परागजैन, व्यवस्थापकीय संचालक, मरापविम.

ट्रुजेटने औरंगाबाद-तिरुपती विमानसेवा सुरू करून मोठे कार्य केले आहे. यामुळे दोन्हीकडील पर्यटन विकासाला चालना मिळेल. देशांतर्गत विदेशाशी औरंगाबाद जोडले जावे. यासाठी प्रयत्न व्हावेत. आशिषगर्दे, अध्यक्ष, सीएमआए.

पहिल्या दिवशीची स्थिती
विमानाचीप्रवासी क्षमता : ७२
हैदराबादवरून आलेले प्रवासी : ४२
औरंगाबाद ते हैदराबाद प्रवासी : ५५
तिकीट दर अॅडव्हान्स बुकिंग केल्यास १८०० रुपये, वेळेवर ते ४५०० रुपये

मनपा आयुक्त ताटकळले
विमानउद््घाटनाला मनपा आयुक्त प्रकाश महाजन ऐनवेळी हजर झाले. त्यांच्याकडे शेवटच्या गेटपर्यंत जाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्यांना सोडले नाही. याची माहिती विमान प्रशासनाला कळताच धावत परवानगीचे पत्र तयार करून ते आयुक्तांना घेण्यासाठी गेले. तोपर्यंत १० मिनिटे त्यांना ताटकळत उभे राहावे लागले.

...तरचउद्याेगांची वाढ हाेईल
अजिंठा-वेरूळपर्यटन विकास संवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून २००९ मध्ये नवीन विमानतळ इमारत समर्पित झाली. मात्र, एअर इंडियाचे २, जेट एअरवेज आणि ट्रुजेट अशी विमानसेवा सुरू आहे. विमानसेवा अधिकाधिक राज्ये, विदेशाला जोडण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न व्हायला हवेत. तेव्हाच पर्यटन उद्योगवाढ होईल.

वेळ : हैदराबाद११.३० वाजता उड्डाण भरेल. १२.५० ला औरंगाबाद विमानतळावर उतरेल. ०१.१५ वाजता येथून उड्डाण घेऊन ते हैदराबादला २.३५ ला पोहोचेल.