आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळी औष्णिक विद्युत केंद्राचे काउंटडाऊन सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी-परळीयेथील वीज निर्मिती केंद्रातील २५० मॅगावॅट क्षमतेचा संच क्रमांक सात बंद पडण्याच्या मार्गावर आहे. मंगळवारी सकाळी अकरा वाजता हा संच बंद करण्याचे ऊर्जा विभागाकडून आदेश येताच बॉयलरमध्ये टाकण्यात येणारा कोळसा बंद करण्यात आला.

भर पावसाळ्यात दुसऱ्यांदा वीज निर्मिती केंद्र रात्री कोणत्याही क्षणी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. परळी औष्णिक वीज निर्मीती केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या सोनपेठ तालुक्यातील खडका बंधाऱ्यातील पाणीसाठा संपला आहे. हा पाणीसाठा संपल्याने आठवडा भरा पासून चालू असलेले चार संच टप्प्या-टप्प्याने बंद करण्यात आले आहेत. २१० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक पाच शेवटी पाण्याअभावी बंद करण्यात आला तर २५० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक सात चालविण्यासाठी पाणीच शिल्लक राहिले नाही. थर्मलमधील आधिकाऱ्यांना वरिष्ठांकडून हा संच बंद करण्याचे आदेश आले नसल्याने नाईलाजास्तव तो संच चालविण्यात येत होता. मंगळवारी सकाळी अकरा वाजता हा संच बंद करण्याचे ऊर्जा विभागाकडून आदेश येताच बॉयलरमध्ये टाकण्यात येणारा कोळसा बंद करण्यात आला. बॉयलरमधील कोळसा संपेपर्यंत तो संच सुरू राहणार आहे. बॉयलरमधील कोळसा रात्री उशिरापर्यंत संपणार आहे. त्यानंतर हा संच बंद करण्यात येणार आहे. भर पावसाळयात केवळ पाण्याअभावी दुसऱ्यांदा संच बंद करावा लागला आहे. मागील वर्षी पावसाळ्यात सर्व संच बंद करावे लागले होते. त्यामुळे राज्याला ११३० मेगावॅट विजेचा तुटवडा भासणार आहे.

दहा हजार कामगारांचा रोजगार बुडणार
परळीयेथील वीज निर्मिती केंद्रात रोजंदारीवर काम करणारे दहा हजार कामगार असून त्यांचा आता रोजगार बुडणार आहे. याचा शहरातील बाजारपेठांवर मोठा परिणाम होणार आहे. अाधीच दुष्काळी परिस्थितीमुळे शहरातील बाजारपेठा मंदीत आहेत. त्यात वीज निर्मिती केंद्र केवळ पाण्यामुळे बंद होणार असल्याने कामगारांची उपासमार होणार आहेे. पाऊस पडल्यांनतरच आता एक महिन्याने हे केंद्र सुरू होण्याची शक्यता आहे.

आमची तयारी सुरू आहे
पाण्याअभावीवीज केंद्रातील सर्व संच बंद करावे लागले आहे. पाऊस पडून खडका बंधाऱ्यात पाण्याचा साठा निर्माण झाल्यास वीज निर्मिती पूर्ववत सुरू करणार आहोत. आमची त्या दृष्टीने सर्व तयारी आहे.'' एस.ई. गिरी, जनसंपर्कअधिकारी, थर्मल

एक लाख मीटर
परळीयेथे २१० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता असलेले तीन २५० मेगावॅट क्षमतेचे दोन संच आहेत. पाच संच पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी येथे एक लाख मीटर क्यूब पाण्याचा वापर होतो. पाच संचाची एकूण क्षमता ११३० मेगावॅट वीज िनर्मितीची आहे.