आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगापुरात जनआंदोलनाचा दणका, रस्ते दुरुस्तीस प्रारंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर- गंगापूर शहरातून जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी "दिव्य मराठी'तर्फे जनजागृतीसाठी सलग चार दिवस वृत्तमालिका प्रकाशित करण्यात आली होती. तसेच शहर बचाव कृती समितीतर्फे सुरू असलेल्या जनआंदोलनाला यश आले असून सोमवार, दि. २० रोजी कार्यकारी अभियंत्यांनी आंदोलनकर्त्या नागरिकांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मंगळवारी सकाळी नऊ वाजेपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून रस्त्यांच्या दुरुस्तीला प्रारंभ झाला आहे. यामुळे खराब रस्त्यांमुळे त्रस्त असलेल्या गंगापूरकरांना दिलासा मिळाला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मांजरी फाटा व लासूर नाका ते भेंडाळा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गंगापूर शहरातील सर्वस्तरांतील नागरिकांनी पक्षीय भेद बाजूला ठेवून शहर बचाव कृती समितीच्या नेतृत्वात जनआंदोलन उभे केले होते. शहरवासीयांसह तालुक्यातील नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा व जिव्हाळ्याच्या प्रश्नावर एकजुटीचे प्रदर्शन दाखवून सार्वजनिक बांधकाम विभागाला काम करण्यास भाग पाडले. दुरुस्तीच्या कामास प्रारंभ मंगळवारी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जेसीबीच्या साहाय्याने खराब झालेला रस्ता खोदून त्यावर डांबरमिश्रित खडी टाकून तयार करण्यात आला. याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...